शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

कुमारस्वामी राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात; मनात 'अ‍ॅक्सिडेंटल मुख्यमंत्री' बनल्याची भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: August 03, 2019 6:25 PM

कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात कुमारस्वामी यांना अपयश आलं आहे.

बेंगळुरु : गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर कर्नाटकमध्ये अस्थिर राजकारणाचे वारे वाहू लागले होते. बहुमत मिळालेल्या भाजपाला सत्तेपासून रोखण्यासाठी जेडीएस आणि काँग्रेसने एकत्र येत सत्ता स्थापन केली होती. कमी जागा असूनही कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले होते. मात्र, त्यांना राजकीय नाट्यामुळे मुख्यमंत्री पदावरून पायऊतार व्हावे लागले. 

या सर्व घडामोडींनंतर सत्ता गेल्यावर कुमारस्वामींनी पहिल्यांदाच मनातील खदखद व्यक्त केली आहे. मी राजकारणात अपघातानेच आलो होतो. तसेच मुख्यमंत्रीही अपघातानेच बनलो. देवाने मला दोनदा मुख्यमंत्री होण्याची संधी दिली. मी तिथे कोणाला खूश करण्यासाठी बसलो नव्हतो. राज्याच्या विकासासाठी मी गेले 14 महिने चांगले काम केले आहे. मी समाधानी असल्याचे सांगत त्यांनी मनात चाललेली खळबळही व्यक्त केली आहे. 

मी आजचे राजकारण कोणत्या थराला, दिशेला जात आहे हे पाहिले आहे. राजकारण हे श्रेत्र चांगल्या लोकांसाठी नाही. ते जातीयवादी आहे. मी ठरवले आहे. मला शांततेत जगायचे आहे. राजकारण माझ्या कुटुंबाला नकोसे झाले आहे. मला लोकांच्या हृदयात जागा हवी आहे. माझे ठरलेय मला राजकारणात राहायचे नाही. राजकारणातून दूर जाण्याचा विचार सुरु असल्याचे कुमारस्वामी यांनी सांगितले. 

 

भाजपला सत्तास्थापनेसाठी बोलावल्यानंतर भाजपाने बहुमत सिद्ध करताच भाजपाकडून मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली जाईल. कर्नाटक विधानसभेत 224 आमदार असल्याने बहुमतासाठी 113 आमदारांचे संख्याबळ आवश्यक आहे. मात्र, सभागृहातील आज उपस्थित आमदारांचा विचार केल्यास, काँग्रेसच्या बाजुने 95 आणि विरोधात 105 मतदान झालं आहे. त्यामुळे, कर्नाटकात भाजपचं ऑपरेशन लोटस यशस्वी झालं आहे. 

कर्नाटक विधानसभेत बहुमत सिद्ध करण्यात कुमारस्वामी यांना अपयश आलं आहे. त्यामुळे भाजपाची खेळी यशस्वी ठरली, असे म्हणता येईल. आज दिवसभरात काँग्रेसचे दोन आमदार गायब असल्याचे पाहायला मिळाले. तर 15 आमदार मुंबईतील पंचतारांकीत हॉटेलमध्ये आहेत. त्यामुळे कुमारस्वामी यांना बहुमत सिद्ध करता आले नाही. 20 महिन्यांनंतर कर्नाटकमधील सरकार कोसळले. या घटनेनंतर काय होऊ शकते हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र बहुमत असल्याने भाजपाला सत्तास्थापनेसाठी बोलावले जाईल. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटक