शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

नातवाला संसर्ग होऊ नये म्हणून कोरोना पॉझिटिव्ह आजी-आजोबाने ट्रेन समोर उडी घेऊन केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 9:43 AM

Fear of covid-19 : रविवारी कुटुंबीयांना काहीही न सांगता हे दाम्पत्य घरातून निघून गेले. त्यानंतर त्यांनी कोटाहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या केली.

ठळक मुद्देराजस्थानमधील कोटा शहरात सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. येथील पोलीस खात्यामधील ६०० हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी आतापर्यंत कोरोनाने बाधित झाले आहेत.

कोटा : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशात हाहाकार माजला आहे. दररोज भारतात तीन लाखांच्यावर नव्या रुग्णांची नोंद होत आहे. यातच देशातील कोचिंग सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोटा शहरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. याठिकाणी कोरोनाची लागण झालेल्या एका वृद्ध दाम्पत्याने ट्रेनसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. कारण, आपल्यामुळे आपल्या नातवालाही कोरोनाचा संसर्ग होईल, या भीतीपोटी दाम्पत्याने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. (kota corona s awe elderly couple committed suicide in coaching city)

या घटनेची संपूर्ण शहरामध्ये चर्चा सुरु असून या दाम्पत्याच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.  यासंदर्भातील वृत्त न्यूज १८ ने दिले आहे. त्यानुसार, पोलीस उपाधीक्षक भगवत सिंह हिंगड यांनी सांगितले की, संबंधित घटना रविवारी सायंकाळी घडली. येथील  रेल्वे कॉलनी परिसरात राहणारे हीरालाल बैरवा (वय ७५) आणि त्यांची पत्नी शांती बैरवा (वय ७५) यांचा कोरोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे दोघेही तणावाखाली होते. त्यांनी घरीच क्वारंटाइन होण्याचा निर्णय घेतला. मात्र, आपल्यामुळे आपला नातू रोहित याला कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती त्यांना वाटत होती.

(CoronaVirus News : अमेरिकेकडून वैद्यकीय मदत, रेमडेसिविरच्या १२५००० कुपी भारतात दाखल)

मुलाचे आठ वर्षापूर्वी निधनरविवारी कुटुंबीयांना काहीही न सांगता हे दाम्पत्य घरातून निघून गेले. त्यानंतर त्यांनी कोटाहून दिल्लीला जाणाऱ्या रेल्वे ट्रॅकवर रेल्वे समोर उडी मारुन आत्महत्या केली. यासंदर्भातील माहिती मिळाल्यानंतर रेल्वे कॉलनी पोलीस स्थानकातील पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. यानंतर पोलिसांनी या दोघांचेही मृतदेह एमबीएस रुग्णालयामध्ये नेले. येथील शवगृहामध्ये हे मृतदेह ठेवण्यात आले. त्यानंतर प्राथमिक तपास केल्यानंतर या दाम्पत्याच्या मुलाचे आठ वर्षापूर्वी निधन झाल्याची माहिती मिळाली. तसेच, आपल्यामुळे नातवाला कोरोनाचा संसर्ह होईल, अशी भीती या दोघांच्या मनात होती, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

कोटामध्ये कोरोनाची स्थिती गंभीरराजस्थानमधील कोटा शहरात सुद्धा कोरोनाबाधितांची संख्या दिवसेदिवस वाढत आहे. येथील पोलीस खात्यामधील ६०० हून अधिक कर्मचारी आणि अधिकारी आतापर्यंत कोरोनाने बाधित झाले आहेत. शहरातील सर्वच रुग्णालयांमध्ये कोरोना रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRajasthanराजस्थान