CoronaVirus News : अमेरिकेकडून वैद्यकीय मदत, रेमडेसिविरच्या १२५००० कुपी भारतात दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2021 08:45 AM2021-05-03T08:45:47+5:302021-05-03T08:49:52+5:30

CoronaVirus News : कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे.

CoronaVirus News: Medical aid from US, 125,000 vials of Remedesivir delivered to India | CoronaVirus News : अमेरिकेकडून वैद्यकीय मदत, रेमडेसिविरच्या १२५००० कुपी भारतात दाखल

CoronaVirus News : अमेरिकेकडून वैद्यकीय मदत, रेमडेसिविरच्या १२५००० कुपी भारतात दाखल

Next
ठळक मुद्देकोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला मदत करण्यासाठी जगातील इतर देशांनी पुढाकार घेतला आहे.

नवी दिल्ली : देशात कोरोना (Corona) व्हायरस दिवसेंदिवस वाढत आहे. दररोज भारतात तीन लाखांच्यावर नव्या रुग्णांची नोंद होत आहे. तर कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) देशाला नव्या संकटाच्या गर्तेत ढकलताना दिसत आहे. बेड, ऑक्सिजन आणि वेळेत उपचार न मिळाल्याने दररोज हजारो नागरिकांना प्राण गमावावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करणाऱ्या भारताला मदत करण्यासाठी जगातील इतर देशांनी पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी सकाळी अमेरिकेतून (America) भारतात विमान दाखल झाले असून यामध्ये कोरोनासोबत लढण्यासाठी वैद्यकीय मदत पाठवण्यात आली आहे. (A flight carrying 125,000 vials of antiviral drug Remdesivir arrived at Delhi airport from United States )

अमेरिकेकडून पाठविण्यात आलेल्या रेमडेसिविरच्या १२५००० कुपी सोमवारी दिल्ली विमानतळावर पोहोचल्या आहेत. यामुळे देशातील रेमडेसिविरचा तुडवडा कमी करण्यास मदत होईल. दुसरीकडे, कोरोना रुग्णांसाठी लागणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यासाठी भारतीय हवाई दल पूर्णपणे प्रयत्न करत आहे. भारतीय हवाई दलाच्या सी -१७ विमानाने ४ क्रायोजेनिक ऑक्सिजन टँकर्स जर्मनीहून उड्डाण करत हिंडन विमानतळावर पोहोचवले. या व्यतिरिक्त ४५० ऑक्सिजन सिलिंडर्सही यूकेमधून विमानाने चेन्नईच्या विमानतळार आणले. भारतीय हवाई दलाने याबाबत माहिती दिली आहे.

दुसरीकडे, भारत सरकारकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार ४ मे रोजी ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉनसन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात व्हर्च्युअल बैठक होणार आहे. या बैठकीपूर्वी ब्रिटनने आणखी १००० व्हेंटिलेटर भारतात पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या गंभीर कोरोना रुग्णांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल. गेल्या आठवड्याच्या सुरुवातीला ब्रिटनने २०० व्हेंटिलेटर, ४९५ ऑक्सिजन कंसनट्रेटर्स आणि तीन ऑक्सिजन जेनेरेशन युनिट देखील देण्याचे जाहीर केले होते.

दरम्यान, गेल्या शुक्रवारी अमेरिकेच्या हवाई दलाचे सुपर गॅलॅक्सी विमान नवी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले होते. या विमानातून ४०० ऑक्सिजन सिलेंडर्स, रुग्णालयांसाठी लागणारे वैद्यकीय साहित्य आणि १० लाख रॅपिट कोरोना टेस्ट किट पाठवण्यात आले होते.त्यावेळी भारतातील अमेरिकी दुतावासाने ट्विट केले होते. यामध्ये विमानाचा फोटो शेअर करत म्हटले होते की, "अमेरिकेतून आणीबाणीच्या कोविड संकटाशी लढण्यासाठी मदतीची पहिली खेप भारतात आली आहे. ७० वर्षांपासून एकमेकांना सहकार्य करत असून करोना संकटाशी लढा देण्यासाठी अमेरिका खंबीरपणे भारतासोबत आहे".

(कोरोना संकटावर मात करण्यासाठी अमेरिकेकडून भारतात वैद्यकीय मदत दाखल)

नरेंद्र मोदी-जो बायडेन यांच्यात फोनवरून संवाद!
लस बनविणासाठी लागणाऱ्या कच्च्या मालावरील निर्यातबंदी अमेरिकेने हटविण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर गेल्या सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची फोनवरून महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली होती. यावेळी "आम्ही दोन्ही देशांतील कोरोनाच्या परिस्थितीविषयी तपशीलवार चर्चा केली. तसेच अमेरिकेकडून भारताला मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल मी त्यांचे आभार मानले," अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली होती. तर "लसीसाठी आवश्यक असलेल्या कच्च्या मालाच्या आणि औषधांच्या पुरवठ्याबाबतही आमची महत्त्वपूर्ण चर्चा पार पडली. भारत अमेरिका या दोन्ही देशांमध्ये असलेली आरोग्य क्षेत्रातील भागीदारी कोरोनाचे जागतिक आव्हान सोडवू शकते," असेही ते म्हणाले होते. 
 

Read in English

Web Title: CoronaVirus News: Medical aid from US, 125,000 vials of Remedesivir delivered to India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.