शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

"निदान हसू तरी नका"; कोलकाता प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल यांना सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2024 16:57 IST

कोलकाता प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान, पश्चिम बंगाल सरकारचे वकील कपिल सिब्बल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यात जोरदार वादावादी झाली.

Kapil Sibal : कोलकाताच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये प्रशिक्षणार्थी डॉक्टरचा बलात्कार करुन हत्या केल्याच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात गुरुवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान, पश्चिम बंगाल सरकारचे वकील कपिल सिब्बल आणि सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्यात जोरदार वादावादी झाली. कपिल सिब्बल हे कोलकाता प्रकरणात पश्चिम बंगाल सरकारचे प्रतिनिधित्व करत आहेत, तर सीबीआयच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता न्यायालयात हजर होते. या सुनावणीदरम्यान कपिल सिब्बल एका गोष्टीवर हसायला लागले, त्यामुळे तुषार मेहता चांगलेच संतापले  आणि त्यांना कोर्टातच खडसावले.

सुप्रीम कोर्टाच्या तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर कोलकाता डॉक्टर बलात्कार-हत्या प्रकरणाची सुनावणी झाली. गुरुवारी सीबीआय आणि कोलकाता पोलिसांनी सीलबंद लिफाफ्यात त्यांचा स्टेटस रिपोर्ट सुप्रीम कोर्टाला सादर केला. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरु आहे. त्यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी पश्चिम बंगाल सरकारचे प्रतिनिधित्व करत असलेल्या कपिल सिब्बल यांना झापले.

झालं असं की तुषार मेहता कोलकाता प्रकरणातील डीडी एंट्रीबाबत आपले मत मांडत होते, तेव्हा सिब्बल यांनी त्यांच्या प्रश्नाला हसून उत्तर दिले. सुनावणी सुरु असतानाच सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी कपिल सिब्बल यांच्या हसण्यावर आक्षेप घेतला. "कोणीतरी (कोलकाता येथील महिला डॉक्टर) मरण पावली आहे. त्या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. तुम्ही हसू कसे शकता? निदान हसू तरी नका, हा कुणाच्या तरी प्रतिष्ठेचा प्रश्न आहे," अशा शब्दात तुषार मेहता यांनी सिब्बल यांना सुनावले.

त्यानंतर सॉलिसिटर तुषार मेहता म्हणाले की, 'आमच्याकडे पश्चिम बंगालच्या विद्यमान मंत्र्याचे विधान आहे, ते म्हणतात की आमच्या नेत्याविरोधात काही बोलले तर बोटे छाटली जातील.' त्यावर सिब्बल म्हणाले की, 'तुमचे नेते म्हणतात की गोळी घालू!' यावेळी सरन्यायाधिशांनी दोन्ही वकिलांना शांत केले आणि म्हणाले, 'याचे राजकारण करू नका, आम्हाला डॉक्टरांच्या कल्याणाची आणि सुरक्षिततेची देखील काळजी आहे.

यावेळी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी खुलासा केला की सीबीआयसाठी तपास सुरू करणे हे एक आव्हान आहे आणि गुन्ह्याच्या पुराव्यांसोबत छेडछाड करण्यात आली आहे. सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, पश्चिम बंगाल पोलिसांनी आधी पीडितेच्या पालकांना सांगितले की हे आत्महत्येचे प्रकरण आहे आणि नंतर त्यांना सांगितले की ही हत्या आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मृताच्या अंतिम संस्कारानंतर १२.४५ वाजता एफआयआर नोंदवण्यात आला. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयkapil sibalकपिल सिब्बलwest bengalपश्चिम बंगालCrime Newsगुन्हेगारी