कोलकाता पोलीसही #MeToo कॅम्पेनमध्ये सहभागी; फेसबुकवर शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2017 15:07 IST2017-10-18T13:41:32+5:302017-10-18T15:07:28+5:30

ऑस्कर विजेते निर्माते हार्वे वाइनश्टीन यांच्यावर हॉलिवूडमधील २० पेक्षा जास्त अभिनेत्रींनी शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप केला होता.

Kolkata Police also participates in the #MeToo Campaign; Post shared on Facebook | कोलकाता पोलीसही #MeToo कॅम्पेनमध्ये सहभागी; फेसबुकवर शेअर केली पोस्ट

कोलकाता पोलीसही #MeToo कॅम्पेनमध्ये सहभागी; फेसबुकवर शेअर केली पोस्ट

ठळक मुद्देऑस्कर विजेते निर्माते हार्वे वाइनश्टीन यांच्यावर हॉलिवूडमधील २० पेक्षा जास्त अभिनेत्रींनी शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप केला होता. या मुद्दयावर बोलताना हॉलिवूडमधील अभिनेत्री एलिसा मिलानो हिनं माझ्यासोबतही असं घडलं आहे म्हणत #Me Too ट्विट केलं आणि हे ट्विट चांगलेच व्हायरल झालं.कॅम्पेनला दुनियाभरातून महिलांचा सहभाग मिळतो आहे.

कोलकाता- ऑस्कर विजेते निर्माते हार्वे वाइनश्टीन यांच्यावर हॉलिवूडमधील २० पेक्षा जास्त अभिनेत्रींनी शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप केला होता. या मुद्दयावर बोलताना हॉलिवूडमधील अभिनेत्री एलिसा मिलानो हिनं माझ्यासोबतही असं घडलं आहे म्हणत #Me Too ट्विट केलं आणि हे ट्विट चांगलेच व्हायरल झालं. या कॅम्पेनला दुनियाभरातून महिलांचा सहभाग मिळतो आहे. या कॅम्पेनला कोलकाता पोलिसांनीही समर्थन दिलं आहे. कोलकाता पोलिसांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करत या कॅम्पेनला पाठिंबा दिला आहे. 

कोलकाता पोलिसांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लैंगिक शोषणाच्या विरोधात महिलांनी मजबूत व्हावं, असं म्हंटलं आहे. तसंच या मुद्द्यावर पोलीस संतप्त असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं आहे. लैंगिक शोषणाच्या प्रत्येक तक्रारावीर कठोर पाऊलं उचलणार असून दोषींवर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हंटलं आहे. महिलांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असंही कोलकाता पोलिसांनी म्हंटलं आहे. महिलांनी कधीही तक्रार दाखल करण्यासाठी यावं, पोलीस त्यांची तक्रार दाखल करून कारवाई करायला तत्पर असतील, असा विश्वास पोलिसांनी महिलांना दिला आहे. कोलकाता पोलिसांनी शेअर केलेली ही फेसबुक पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे. कोलकाता पोलिसांनी ही पोस्ट टाकतात अनेकांनी कमेन्ट करत त्याचं कौतुक केलं तसंच अनेकांनी टीकाही केली आहे.

काय आहे #Me Too

अभिनेत्री एलिसा मिलानो हिने शारीरिक शोषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य जगासमोर येण्यासाठी ट्विट केलं. 'आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर शारीरिक शोषण झालेल्या महिलांनी जर #Me Too लिहून स्टेटस शेअर केला, तर कदाचित स्त्रियांच्या शोषणाचा प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव लोकांना होईल,' असे ट्विट तिने केलं आणि जगभरातील महिला याविषयी आपली मतं मांडू लागल्या.

भारतातही ट्रेडिंग
या कॅम्पेनमध्ये हॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपल्याला आलेले अनुभव शेअर केले. भारतातही हा हॅशटॅग ट्रेंड झाला. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून भारतातील अनेक मुली आपल्याला आलेले असे वाईट अनुभव लोकांसमोर मांडले.
 

Web Title: Kolkata Police also participates in the #MeToo Campaign; Post shared on Facebook

टॅग्स :Policeपोलिस