शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

अग्निकल्लोळ! कोलकात्याच्या नाजिराबादमध्ये भीषण आग; ७ जणांचा मृत्यू, २० जण बेपत्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2026 19:08 IST

कोलकात्याच्या नाजिराबाद भागातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

कोलकात्याच्या नाजिराबाद भागातील एका गोदामाला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या आगीत आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. गोदामाच्या आतून दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, आग लागल्यापासून २० जण बेपत्ता आहेत. ड्राय फूड गोदामाला आग लागली आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

आगीवर अंशतः नियंत्रण मिळवल्यानंतर अग्निशमन दलाचे जवान गॅस कटर घेऊन इमारतीत शिरले. आनंदपूरच्या नाजिराबादमधील या गोदामात प्रामुख्याने सुका मेवा, पाकीटबंद खाद्यपदार्थ आणि शीतपेयांच्या बाटल्या साठवल्या होत्या. अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ही आग शेजारील दोन गोदामांमध्ये पसरली असून त्यातील सर्व साहित्य जळून खाक झालं आहे.

गोदाम एका अरुंद गल्लीत असल्याने अग्निशमन दलाच्या गाड्यांना तेथे पोहोचण्यास आणि आग विझवण्यास मोठी कसरत करावी लागली. लांब पाईपशिवाय पाणीपुरवठा करणं कठीण जात असल्याने परिस्थिती नियंत्रणात येण्यास उशीर झाला. काही ठिकाणी अजूनही आग धगधगत असून ती पूर्णपणे विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

बंगालचे मंत्री राज्याचे ऊर्जामंत्री अरुप बिस्वास यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केलं. त्यांनी बचावकार्याचा आढावा घेतला आणि बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांशी चर्चा केली. मंत्री म्हणाले, "पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी आग विझवण्यासाठी एकत्रितपणे काम करत आहेत. आग बऱ्याच अंशी नियंत्रणात आली असून जवान इमारतीत शिरले आहेत. आत आणखी कोणी अडकले आहे का, हे नंतर स्पष्ट होईल. ही वेळ राजकारण करण्याची नसून, अधिकाऱ्यांना त्यांचं काम करू देण्याची आहे."

गोदामाला आग नेमकी कशी लागली, याच कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रात्रीच्या ड्युटीवर असलेले कर्मचारी आत अडकले होते. तसेच सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारे सहा जणही यात अडकल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक रहिवाशांनी असा आरोप केला आहे की, गोदाम बाहेरून बंद होतं, ज्यामुळे आत असलेल्या लोकांना बाहेर पडता आलं नाही.

English
हिंदी सारांश
Web Title : Massive Fire in Kolkata's Nazirabad: 7 Dead, 20 Missing

Web Summary : A devastating fire in Kolkata's Nazirabad area has claimed 7 lives, with 20 still missing. The blaze engulfed a dry food warehouse, spreading to nearby buildings. Firefighters are battling the flames in the narrow alley, rescue operations ongoing.
टॅग्स :fireआगwest bengalपश्चिम बंगाल