‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 08:20 IST2025-06-30T08:20:00+5:302025-06-30T08:20:35+5:30
दरम्यान या घटनेविरोधात निदर्शने करणाऱ्या भाजपच्या नेत्यांसमवेत शनिवारी रात्री ताब्यात घेतलेले केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार रविवारी सकाळी पोलिस मुख्यालयाबाहेर आले.

‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
कोलकाता : कोलकातामधील ज्या महाविद्यालयात सामूहिक बलात्काराची घटना घडली, त्या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या नयना चटर्जी यांनी म्हटले आहे की, सामूहिक बलात्काराबाबत आम्हाला माध्यमांतूनच कळाले. पोलिसांनी सुरुवातीला ही बाब आम्हाला सांगितली नाही.
त्यांनी सांगितले की, मागील गुरुवारी पोलिसांनी आमच्या परिसरात प्रवेश करण्याची परवानगी मागितली. त्यांची भेट गोपनीय होती. पोलिसांनी दोन खोल्या सील केल्या. या घटनेनंतर पीडितेने किंवा कुटुंबीयांपैकी कोणीही आमच्याशी संपर्क साधला नाही.
दरम्यान या घटनेविरोधात निदर्शने करणाऱ्या भाजपच्या नेत्यांसमवेत शनिवारी रात्री ताब्यात घेतलेले केंद्रीय मंत्री सुकांत मजुमदार रविवारी सकाळी पोलिस मुख्यालयाबाहेर आले.
राष्ट्रीय महिला आयोग महाविद्यालयात
राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या अर्चना मजुमदार रविवारी साऊथ कोलकाता लॉ कॉलेजमध्ये दाखल झाल्या. आम्ही पीडित विद्यार्थिनीच्या बाजूने उभ्या असून, ती सध्या कुठे आहे, याची माहिती पोलिस देऊ शकले नाहीत. आम्ही तिला मदत करू इच्छित आहोत. आयोगाकडील चौकशीचा हा एक भाग आहे. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांशी त्यांचा वादही झाल्याचे सांगण्यात येते.