कोलकातामधील बगाडी मार्केटमध्ये भीषण आग

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2018 09:42 IST2018-09-16T09:29:23+5:302018-09-16T09:42:36+5:30

कोलकातामधील बगाडी मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे.

Kolkata: Fire breaks out at Bagri Market in Canning Street | कोलकातामधील बगाडी मार्केटमध्ये भीषण आग

कोलकातामधील बगाडी मार्केटमध्ये भीषण आग

कोलकाता - पश्चिम बंगालची राजधानी असलेल्या कोलकातामधील बगाडी मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. रविवारी (16 सप्टेंबर) अडीचच्या सुमारास पाच मजली इमारतीला आग लागली. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाचे जवान शर्थीचे प्रयत्न करत असून अग्निशामक दलाच्या तब्बल 30 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, आग लागलेल्या इमारतीच्या परिसरात अनेक इमारती असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना आग विझवण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या आगीत अद्याप कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. 





Web Title: Kolkata: Fire breaks out at Bagri Market in Canning Street

टॅग्स :fireआग