कोलकाता विमानतळावर बसची एअर इंडियाच्या विमानाला धडक
By Admin | Updated: December 22, 2015 09:06 IST2015-12-22T09:05:58+5:302015-12-22T09:06:18+5:30
कोलकाता विमानतळावर जेट एअरवेजच्या बसने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एअर इंडियाच्या विमानाला धडक दिल्याने विमानाचे बरेच नुकसान झाले आहे.

कोलकाता विमानतळावर बसची एअर इंडियाच्या विमानाला धडक
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. २२ - कोलकाता विमानतळावर जेट एअरवेजच्या बसने पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या एअर इंडियाच्या विमानाला धडक दिल्याने मोठा अपघात झाला असून त्यात विमानाचे बरेच नुकसान झाले आहे. आज सकाळी साडेसहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. मात्र सुदैवाने विमानात कोणीही प्रवासी नसल्याने मोठी जीवितहानी टळली.
एअर इंडियाचे हे विमान आसामला उड्डाण करणार होते, मात्र जेट एअर वेजच्या चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने ती बस पार्किंगमध्ये उभे असलेल्या विमानावर आदळली. याप्रकरणी बसचालकाची चौकशी करण्यात येत आहे.