Video - धक्कादायक! पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेत्याला आला हार्ट अटॅक; झाला मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2024 08:14 IST2024-08-20T08:13:43+5:302024-08-20T08:14:30+5:30

एका काँग्रेस नेत्याला हार्ट अटॅक आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहिल्यावर तुम्हालाही मोठा धक्का बसेल.

kolar kuruba sangha president collapses due to heart attack during press meet | Video - धक्कादायक! पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेत्याला आला हार्ट अटॅक; झाला मृत्यू

Video - धक्कादायक! पत्रकार परिषदेत बोलताना काँग्रेस नेत्याला आला हार्ट अटॅक; झाला मृत्यू

कर्नाटकची राजधानी बंगळुरूमध्ये धक्कादायक घटना घडला आहे. एका काँग्रेस नेत्याला हार्ट अटॅक आल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहिल्यावर तुम्हालाही मोठा धक्का बसेल. बंगळुरू येथील कोलार कुरुबा संघाचे अध्यक्ष रवींद्र यांना प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषदेदरम्यान अचानक हार्ट अटॅक आला आणि यामध्ये त्यांचं निधन झालं.

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरुद्ध खटला चालवण्यास परवानगी देण्याच्या राज्यपालांच्या निर्णयाला उत्तर म्हणून ही पत्रकार परिषद घेण्यात आली. प्रसारमाध्यमांशी संवाद साधत असताना माईकवर बोलत असतानाच काँग्रेस नेते रवींद्र अचानक खुर्चीवरून खाली पडले.

रवींद्र यांना यानंतर तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. हार्ट अटॅकने त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. तसेच परिसरात खळबळ उडाली आहे. 

या घटनेचा जो व्हिडीओ समोर आला आहे, त्यात स्पष्टपणे दिसत आहे की, रवींद्र खुर्चीवर बसून माईकवर पत्रकारांना संबोधित करत असताना त्यांना हार्ट अटॅक आला. त्यानंतर त्यांच्या हातातून काही कागद निसटला आणि खाली पडला. त्यावेळी लोकांनी लक्ष दिले नाही. मात्र, काही सेकंद गेल्यानंतर खुर्चीसह ते खाली पडले, त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: kolar kuruba sangha president collapses due to heart attack during press meet