PM Kisan योजनेच्या निधीतून ५५ हजार शेतकऱ्यांना वगळले; नेमकं कारण काय? पाहा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 9, 2021 11:16 AM2021-10-09T11:16:39+5:302021-10-09T11:18:21+5:30

PM Kisan Samman Nidhi Scheme: शेतकरी आता पीएम किसान सन्मान योजनेतील पुढील हप्त्याची वाट पाहत असल्याचे सांगितले जात आहे.

know why 55 thousand farmers from uttar pradesh will not received pm kisan samman nidhi instalment | PM Kisan योजनेच्या निधीतून ५५ हजार शेतकऱ्यांना वगळले; नेमकं कारण काय? पाहा

PM Kisan योजनेच्या निधीतून ५५ हजार शेतकऱ्यांना वगळले; नेमकं कारण काय? पाहा

googlenewsNext

नवी दिल्ली: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या किसान सन्मान निधी (PM Kisan Samman Nidhi Scheme) योजना सुरू करण्यात आली आहे. या निधीचा आता दहावा हप्ता दिला जाणार आहे. शेतकरी आता पीएम किसान सन्मान योजनेतील पुढील हप्त्याची वाट पाहत असल्याचे सांगितले जात आहे. काही महिन्यांपूर्वी देशात ४२.१६ लाख अपात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा घेतला असून, त्यांच्याकडून सरकार २९,९२७ कोटी रुपये वसूल करणार असल्याची माहिती समोर आली होती. त्यातच आता या योजनेतून सुमारे ५५ हजार शेतकऱ्यांची नावे वगळण्यात आल्याचे सांगितले जात आहे. (pm kisan samman nidhi instalment)

गेल्या काही काळात काही बोगस शेतकऱ्यांनीही या योजनेतील पैसे लाटल्याची बाब समोर आली होती. त्यानंतर केंद्र सरकारने शेतकऱ्यांची पडताळणी सुरु केली होती. या तपासणीदरम्यान अपात्र असूनही योजनेते पैसे लाटणाऱ्यांकडून ते पुन्हा वसूल केले जात आहेत. यातच आता सुमारे ५५ शेतकऱ्यांना या योजनेचे पैसे मिळणार नसल्याचे सांगितले जात आहे.  

या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार नाहीत

उत्तर प्रदेशमध्ये असलेल्या बरेलीत ५५ हजार २४३ अपात्र शेतकरी पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे पैसे लाटत असल्याचा प्रकार समोर आला होता. त्यामुळे आता या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले जाणार नाहीत. सप्टेंबर महिन्यात जिल्हा स्तरावर तपास करण्यात आला. ज्यामध्ये ही फसवणूक उघडकीस आली. या प्रकरणात अपात्रांना जिल्हा कृषी विभागाच्या वतीने वसुली नोटीसा दिल्या जात आहेत. वसुलीनंतर हा पैसा सरकारच्या तिजोरीत जमा होईल, अशी माहिती मिळाली आहे. 

गावागावात जाऊन याबाबत चौकशी होणार

शेतकरी असल्याचे खोटे सांगत पीएम किसान सन्मान निधी योजनेचा फायदा घेणाऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली होती. या योजनेतील लाभार्थींची तपासणी सुरू करण्यात आली. गावागावात जाऊन याबाबत चौकशी करण्यात येत आहे. खोटी माहिती देऊन या योजनेंतर्गत शेतीसाठीची वार्षिक मदत घेणाऱ्यांवर कारवाई करून त्यांची मदत बंद तर केली जाईलच, मात्र सोबत याआधी मिळवलेल्या पैशांचीही भरपाई करुन घेण्यात येणार आहे, असे सांगितले जात आहे. यापूर्वी उत्तर प्रदेशामधील गोरखपूर जिल्ह्यात अशाप्रकारे बोगस शेतकऱ्यांची तपासणी करण्यात आली होती. 
 

Web Title: know why 55 thousand farmers from uttar pradesh will not received pm kisan samman nidhi instalment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.