बुलंदशहरः उत्तर प्रदेशतल्या बुलंदशहरमधले खासदार भोला सिंह यांनी ईदच्या एक दिवसापूर्वीच मुस्लिमांना सल्ला दिला आहे. ईदच्या उत्साह साजरा करताना कोणालाही त्रास होणार नाही, याची काळजी घ्या. हिंदूसुद्धा होळी, दिवाळी आणि रक्षाबंधनसह इतर सण साजरे करतात. पण त्या सणांचा कोणालाही त्रास होत नाही. भोला सिंह यांनी कोणत्याही धर्माच्या सणाला उल्लेख न करता सांगितलं की, तुमच्या सणामुळे इतर लोकांना त्रास झाल्यास कारवाई करण्यात येईल.तुमच्या श्रद्धेचं प्रदर्शन करण्यासाठी एक खास जागा दिलेली आहे. तुमच्या श्रद्धेच्या नावाखाली रस्त्यांवर वाहतुकीची कोंडी होता कामा नये. तरीही असं झाल्यास प्रशासन योग्य कारवाई करेल.
लक्षात ठेवा, तुमच्या सणाचा कोणालाही त्रास होता कामा नये, भाजपा खासदाराचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2019 11:10 IST