शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
4
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
5
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
6
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
7
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
8
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
9
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
10
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
11
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
12
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
13
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
17
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
18
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
20
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!

Afghanistan Taliban Crisis: काबुलची परिस्थिती पाहता भारतानं आणला e-Emergency X-Misc व्हिसा; जाणून घ्या याबद्दल सर्वकाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 17:09 IST

 गृह मंत्रालय जे व्हिसा निगडीत एक नोडल मिनिस्ट्री म्हणून काम करते. त्यांच्याकडून मंगळवारी या नव्या व्हिसाची घोषणा करण्यात आली  

ठळक मुद्देभारताने व्हिसा कॅटेगिरी नव्याने सुरु केली आहे. कारण व्हिसा प्रक्रिया सहज आणि जलदगतीने होईल. रविवारी १५ ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. काबुल स्थित संसद आणि राष्ट्रपती भवन तालिबानने हाती घेतलंजर अफगाणिस्तानातून कोणत्याही व्यक्तीला भारतात येऊन दुसऱ्या देशात जायचं असेल तर तो E Emergency X Misc व्हिसा घेऊन भारतात येऊ शकतो

नवी दिल्ली – अफगाणिस्तानमध्ये सध्या परिस्थिती गंभीर आहे. त्याठिकाणची परिस्थिती पाहता भारताने स्वत:च्या व्हिसा पॉलिसीत बदल केला आहे. आता इलेक्ट्रोनिक व्हिसाऐवजी नवीन पर्याय देण्यात आला आहे. या व्हिसाला ई-इमरजेन्सी X-Misc व्हिसा म्हटलं गेले आहे. त्यामुळे भारतात येण्यासाठी व्हिसा अर्जदारांना फास्ट ट्रॅक केले जाईल. यावेळी हजारोपेक्षा अधिक भारतीय अफगाणिस्तानात फसले आहेत. भारतीय वायूसेना एअरक्राफ्टच्या माध्यमातून अडकलेल्या भारतीयांना पुन्हा देशात आणत आहेत.

काय आहे या व्हिसाचा उद्देश?

 गृह मंत्रालय जे व्हिसा निगडीत एक नोडल मिनिस्ट्री म्हणून काम करते. त्यांच्याकडून मंगळवारी या नव्या व्हिसाची घोषणा करण्यात आली. गृह मंत्रालयाकडून ट्विट करण्यात आले आहे की, इलेक्ट्रॉनिक व्हिसामध्ये नवीन पर्याय देण्यात आला आहे. सूत्रांनुसार, भारताने व्हिसा कॅटेगिरी नव्याने सुरु केली आहे. कारण व्हिसा प्रक्रिया सहज आणि जलदगतीने होईल. त्यामुळे अडचणीत असलेल्या गरजवंतांसाठी तातडीने सुविधा दिली जाऊ शकते. काबुल स्थित भारतीय दूतावास वेबसाइटनुसार भारतात दाखल होण्यासाठी दोन प्रकारच्या व्हिसाची आवश्यकता असते.

X Visa: म्हणजे एन्ट्री व्हिसा जो भारतीय मूळ असलेल्या कुठल्याही व्यक्तीला जारी केला जातो. हा व्हिसा भारतीय मूळ व्यक्तीशिवाय त्यांच्या बायकोला, मुलांना आणि त्यांच्यावर निर्भर असलेल्या कुटुंबातील सदस्यांना जारी केला जातो. हा व्हिसा त्या कारणासाठी दिला जातो जो कुठल्याही दुसऱ्या व्हिसा कॅटेगिरीत मोडत नाहीत.

X-Misc Visa: म्हणजे एन्ट्री व्हिसा भारतात येणाऱ्या कुठल्याही बाहेरील व्यक्तींसाठी दिला जातो. दिल्ली येथील दुसऱ्या दूतावास कार्यालयात व्हिसा मुलाखतीमार्फत अन्य व्यक्तीला भारतात येण्यासाठी परवानगी दिली जाते. हा व्हिसा प्रत्येक देशातील नागरिकांला दिला जातो. सध्या भारताने फक्त अफगाणिस्तानवरुन येणाऱ्या नागरिकांना ईमरजेन्सी इलेक्ट्रॉनिक व्हिसा सुविधा दिली आहे. याचा अर्थ जर अफगाणिस्तानातून कोणत्याही व्यक्तीला भारतात येऊन दुसऱ्या देशात जायचं असेल तर तो E Emergency X Misc व्हिसा घेऊन भारतात येऊ शकतो आणि दुसऱ्या देशाचा व्हिसा मिळवण्यासाठी मुलाखत देऊ शकतो.

कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता?

  1. त्या पासपोर्टची फोटो कॉपी ज्यात भारतात येण्यासाठी प्रस्तावित तारीख कमीत कमी ६ महिने वैध ठरेल
  2. अफगाणिस्तानच्या नॅशनल स्टैटिस्टिक्स अँन्ड इनफॉर्मेशन अथॉरिटीकडून जारी करण्यात आलेली कागपत्रे, अफगाणी असल्याचं ओळखपत्र
  3. पोलिओ लसीकरण प्रमाणपत्र
  4. ज्या दुसऱ्या देशातील दूतावासात मुलाखत घेण्यासाठी जायचं आहे. त्यांच्याकडून परवानगी मिळालेले पत्र, ज्यात मुलाखतीच्या तारखेचा उल्लेख असेल
  5. तसेच त्या काळाचा उल्लेख हवा ज्यात व्हिसा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दूतावासाकडून लागणारा वेळ

 

परराष्ट्र मंत्रालयाने जारी केला हेल्पलाईन नंबर

रविवारी १५ ऑगस्टला तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. काबुल स्थित संसद आणि राष्ट्रपती भवन तालिबानने हाती घेतलं. त्यानंतर काबुलमधील भारतीय दूतावास आणि इतर स्टाफला पुन्हा भारतात आणलं गेले. त्यानंतर आता एक हेल्पलाईन नंबर जारी करण्यात आला आहे. ९१९७१७७८५३७९ या नंबरवर कॉल करून मदत मागू शकतात. त्यासोबत MEAHelpdeskIndia@gmail.com या ईमेलशी संपर्क साधता येईल.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानIndiaभारत