Pushkar Singh Dhami Profile : जाणून घ्या, कोण आहेत उत्तराखंडचे पुढचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी; संघाची आहे पार्श्वभूमी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2021 06:35 AM2021-07-04T06:35:43+5:302021-07-04T06:38:07+5:30

स्वत: माजी मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी पुष्करसिंह धामी यांच्या नावाची घोषणा केली. धामी हे एक संघाची पार्श्वभूमी असलेले नेते आहेत... (Pushkar Singh Dhami)

Know about the Pushkar Singh Dhami who elected  as next cm of Uttarakhand by BJP legislature party | Pushkar Singh Dhami Profile : जाणून घ्या, कोण आहेत उत्तराखंडचे पुढचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी; संघाची आहे पार्श्वभूमी

Pushkar Singh Dhami Profile : जाणून घ्या, कोण आहेत उत्तराखंडचे पुढचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी; संघाची आहे पार्श्वभूमी

Next

नवी दिल्ली - पुष्कर सिंह धामी (Pushkar Singh Dhami) हे उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री असणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. देहरादून येथे झालेल्या या बैठकीत धामी यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले. ते उत्तराखंडचे 11वे मुख्यमंत्री असतील. आज ते  मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. (Know about the Pushkar Singh Dhami who elected as next cm of Uttarakhand by BJP legislature party)

कोण आहेत पुष्करसिंह धामी? 
युवा नेते पुष्करसिंह धामी हे सध्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. धामी यांचा जन्म पिथौरागडमधील टुंडी या गावी झाला. ते उधमसिंह नगरमधील खतिमा विधानसभा मतदार संघातून यावेळी दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. धामी हे भगतसिंग कोश्यारी यांचे निकटवर्तीय मानले जातात. ते एक संघाची पार्श्वभूमी असलेले नेते आहेत. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत बऱ्याच महत्वाच्या पदांवर काम केले आहे. ते दोन वेळा भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षही राहिले आहेत.

स्वत: माजी मुख्यमंत्री तीरथसिंह रावत यांनी पुष्करसिंह धामी यांच्या नावाची घोषणा केली. उत्तराखंड भाजप विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड झाल्यानंतर पुष्करसिंह म्हणाले, "माझ्या पक्षाने सामान्य कार्यकर्त्याला सेवा करण्याची संधी दिली आहे. आम्ही प्रत्येकाच्या सहकार्याने सार्वजनिक प्रश्नांवर कार्य करू.

धामी म्हणाले, “मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि पक्षाध्यक्ष जेपी नड्डा या सर्वांचे आभार मानतो.” आगामी निवडणुकीत पक्षाच्या विजयासंदर्भात विचारले असता, हे एक आव्हान आहे आणि मी ते स्वीकारतो, अशेही धामी यांनी म्हटले आहे. 

तिरथसिंग रावत यांनी शुक्रवारी रात्री उशिरा राज्यपालांना आपला राजीनामा सादर केला होता. यापूर्वी त्यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून आपण राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. घटनात्मक पेच निर्माण झाल्याने आपण मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देत असल्याचे त्यांनी सांगितले.
 

Web Title: Know about the Pushkar Singh Dhami who elected  as next cm of Uttarakhand by BJP legislature party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.