सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ‘किलबिल’ टॉय रुम

By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:06+5:302015-06-12T17:38:06+5:30

सोलापूर : शासकीय रुग्णालयात गरीब, पीडित, गरजू घटकांमधून उपचार घेण्यासाठी येणार्‍या मुलांचे बालपण हरवू नये यासाठी डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने शुक्रवारी ‘किलबिल टॉय रुमचे’ उद्घाटन करण्यात येणार आहे. यामध्ये घसरगुंडी, खेळण्याचा हत्ती, छोट्या मुलांची सायकल, सी-सॉ व बरेच सॉफ्ट टॉय व इतर खेळणी असणार आहेत. यासोबत त्यांच्या ज्ञानात वाढ होण्यासाठी गोष्टींची पुस्तके, अल्फाबेट बुक्स, रंगरंगोटीची पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. व्हाईट बोर्डचा उपयोग करून अँडमिट असलेली मुले त्यांच्या कल्पनांना अधिक वाव देऊ शकतात. या किलबिल टॉय रुमचे उद्घाटन डॉ. व्ही.एम.जी.एम.सी. चे माजी अधिष्ठाता डॉ. प्रभाकर गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, बालरोग तज्ज्ञ विभागाचे प्रमुख, उमेद ग्रुपचे सभासद उपस्थित

'Kitchen' room in civil hospital | सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ‘किलबिल’ टॉय रुम

सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ‘किलबिल’ टॉय रुम

लापूर : शासकीय रुग्णालयात गरीब, पीडित, गरजू घटकांमधून उपचार घेण्यासाठी येणार्‍या मुलांचे बालपण हरवू नये यासाठी डॉ. वैशंपायन वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या वतीने शुक्रवारी ‘किलबिल टॉय रुमचे’ उद्घाटन करण्यात येणार आहे. यामध्ये घसरगुंडी, खेळण्याचा हत्ती, छोट्या मुलांची सायकल, सी-सॉ व बरेच सॉफ्ट टॉय व इतर खेळणी असणार आहेत. यासोबत त्यांच्या ज्ञानात वाढ होण्यासाठी गोष्टींची पुस्तके, अल्फाबेट बुक्स, रंगरंगोटीची पुस्तके उपलब्ध करण्यात आली आहेत. व्हाईट बोर्डचा उपयोग करून अँडमिट असलेली मुले त्यांच्या कल्पनांना अधिक वाव देऊ शकतात. या किलबिल टॉय रुमचे उद्घाटन डॉ. व्ही.एम.जी.एम.सी. चे माजी अधिष्ठाता डॉ. प्रभाकर गायकवाड यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी अधिष्ठाता डॉ. राजाराम पोवार, बालरोग तज्ज्ञ विभागाचे प्रमुख, उमेद ग्रुपचे सभासद उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 'Kitchen' room in civil hospital