शहरं
Join us  
Trending Stories
1
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
2
लोकसभा अध्यक्षपदाबाबत टीडीपीची अट; भाजपचं टेन्शन वाढलं, नितीशकुमार आता काय करणार?
3
"मुस्लिमांची मतं मिळाल्याचा अभिमान वाटत असेल तर..." बावनकुळेंचा उद्धव ठाकरेंना टोला
4
"आम्ही सगळे तुमच्याबरोबर आहोत, सेंच्युरी मारा"; मुख्यमंत्री शिंदेंचा अण्णा हजारेंना थेट Video Call
5
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना इच्छापूर्ती, व्यवसायात लाभ; नवीन नोकरीची ऑफर, मौज-मजेचा काळ!
6
लेकींचं लग्न पाहण्याची शेवटची इच्छा; ICU त असलेल्या 'बाप' माणसासमोर विवाहसोहळा
7
मुख्यमंत्री देवदूतासारखे धावले; अपघातग्रस्तांना मदतीचा हात: संवेदनशील स्वभावाचा पुन्हा प्रत्यय
8
सह्याद्री प्रकल्पात पट्टेरी 'टी-१' वाघ मुक्कामाला!
9
दहशतवाद्यांची आता खैर नाही, अमित शाह उच्चस्तरीय बैठक घेणार, अजित डोवाल आणि रॉ प्रमुखही उपस्थित राहणार
10
शाहरुखच्या शिक्षकांची प्रकृती चिंताजनक, किंग खानजवळ व्यक्त केली 'ही' शेवटची इच्छा
11
"पाकिस्तानी खेळाडूंना वाटते की...", वसीम अक्रम संतापला; PCB कडे केली मोठी मागणी
12
तलाठी परीक्षा घोटाळ्याचा मास्टर माईंड जेरबंद; नऊ महिन्यांपासून देत होता गुंगारा
13
ऑस्ट्रेलियाला घाम फोडणारा स्कॉटलंड; पराभव होताच कर्णधार भावूक, मार्शकडून कौतुक
14
AUS vs SCO : ऑस्ट्रेलियाच्या जिवावर गतविजेते 'शेर', इंग्लंड सुपर-८ मध्ये; स्कॉटलंडचे स्वप्न भंगले
15
"झुंड में तो कुत्ते आते है...", राणे-सामंत यांच्यातील फलक युद्धाचे लोण रत्नागिरीपर्यंत
16
पाऊस पडावा म्हणून लोकांचं अजब कृत्य; लावले दोन बेडकांचे लग्न!
17
स्पेशल रिपोर्ट: अशोक चव्हाणांवरील 'त्या' आरोपांची विखे करणार चौकशी
18
"खटाखट, टकाटक लूट शुरू…", कर्नाटकात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीवरून भाजपचा निशाणा
19
सांगलीच्या पठ्ठ्याची कहाणी प्रेक्षकांना भावली, 'चंदू चँपियन'च्या कमाईत वाढ झाली
20
एकत्रित लढू अन् सत्ताबदल करू; महाविकास आघाडीच्या तीनही पक्षांनी व्यक्त केला निर्धार!

"अन्नदात्यांना माझा आग्रह आहे की..."; पत्राद्वारे पंतप्रधान मोदींचं आंदोलक शेतकऱ्यांना आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 10:38 AM

PM Narendra Modi And Farmers Protest : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लिहिलेलं पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे.

नवी दिल्ली - नव्या कृषी कायद्यांना विरोध होत असताना केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी देशातील शेतकऱ्यांना उद्देशून एक पत्र लिहिलं आहे. एकूण आठ पानांच्या या पत्रात नरेंद्रसिंह तोमर यांनी शेतकऱ्यांना 'एमएसपी'च्या मुद्द्यावर लेखी आश्वासन देण्याची सरकारची तयारी असल्याचंही म्हटलं आहे. याच दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांनी लिहिलेलं पत्र आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. तसेच शेतकऱ्यांना आवाहन देखील केलं आहे.

"कृषीमंत्री नरेंद्र तोमर यांनी शेतकरी बंधू भगिणींना पत्र लिहून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. नम्रपणे संवाद साधण्याचा एक प्रयत्न केला आहे. सर्व अन्नदात्यांनी हे पत्र वाचावं असा माझा आग्रह आहे. देशवासीयांना आग्रह आहे की, हे पत्र त्यांनी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवावं" असं नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. "कृषी कायद्यांवरुन काही जण राजकारण करत असून समाजात खोटी माहिती पसरवण्याचं काम करत आहेत", असं तोमर म्हणाले. 

केंद्रातील मोदी सरकारने 'सबका साथ, सबका विकास' या मार्गाने कोणताही भेदभाव न करता सर्वांचा विकास करण्याचा प्रयत्न केला आहे. गेल्या ६ वर्षांचा इतिहास याचा साक्षीदार आहे, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.  "कृषी कायद्यांमध्ये केल्या गेलेल्या बदलांमुळे देशाच्या शेती व्यवस्थेचा नवा पाया रचला जाईल. देशातील शेतकऱ्यांना स्वतंत्र करतील, मजबूत करतील. शेतकऱ्यांच्या मोजक्या गटांनी गैरसमज आणि चुकीच्या सूचना पसरवण्याचं काम केलं आहे. ते गैरसमज दूर करणं माझं काम आहे", असं तोमर म्हणाले. 

"कृषी कायद्यांबाबत गैरसमज निर्माण करण्याचं कारस्थान; सत्य ओळखा", कृषीमंत्र्यांचं शेतकऱ्यांना पत्र

रेल्वे रुळांवर आंदोलन केल्यामुळे रेल्वेसेवा ठप्पा झाली आहे. त्यामुळे देशाच्या सीमेचे रक्षण करणाऱ्या आपल्या सैनिकांपर्यंत धान्य पुरवठा होणं बंद झालं आहे. असं करणारे हे शेतकरी असू शकत नाहीत, असंही ते पुढे म्हणाले. कृषी कायद्यांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांसोबत संपर्कात असून अनेक राज्यांच्या शेतकरी संघटनांनी कायद्याला पाठिंबा दिल्याचा दावा तोमर यांनी केला आहे. 

नव्या कृषी कायद्यांमुळे शेतकऱ्यांचा फायदा झाल्याचीही अनेक उदाहरणं पाहायला मिळाली आहेत. मी स्वत: शेतकरी कुटुंबात जन्माला आलो आहे. त्यामुळे शेतीतील सर्व आव्हानं, बारकावे मला चांगले समजतात. शेतीतील आव्हानांना सामोरं जातच मी मोठा झालो आहे, असंही तोमर यांनी पत्रात म्हटलं आहे. केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन अधिकच तीव्र झालेले आहे. या आंदोलनादरम्यान बाबा राम सिंह यांनी स्वत:वर गोळी झाडून घेतली. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले होते. तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदीFarmer strikeशेतकरी संपIndiaभारत