लुधियाना कोर्ट ब्लास्टमध्ये खलिस्तानी गटाचा हात, गुप्तचर यंत्रणांचा खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2021 12:21 PM2021-12-24T12:21:56+5:302021-12-24T12:28:23+5:30

लुधियानातील न्यायालयात काल झालेल्या स्फोटामागे खलिस्तान समर्थित गटाची भूमिका समोर आली आहे. तसेच, या गटाला पाकिस्तानच्या ISIने मदत केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.

Khalistani group involved in the Ludhiana court blast, reveals the intelligence agencies | लुधियाना कोर्ट ब्लास्टमध्ये खलिस्तानी गटाचा हात, गुप्तचर यंत्रणांचा खुलासा

लुधियाना कोर्ट ब्लास्टमध्ये खलिस्तानी गटाचा हात, गुप्तचर यंत्रणांचा खुलासा

Next

चंदीगड: काल म्हणजेच 23 डिसेंबरला पंजाबच्या लुधियाना कोर्टात भीषण स्फोट (Ludhiana Bomb Blast) झाला होता. त्या स्फोटात एकाचा मृत्यू झाला, तर पाचजण गंभीर जखमी झाले. दरम्यान, आता या स्फोटामागे खलिस्तान समर्थित गटाची भूमिका समोर आली आहे. तसेच, या गटाला पाकिस्तानच्या आयएसआयने मदत केल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे. 

अनेक कट उधळून लावले
एएनआय (ANI) या वृत्तसंस्थेने सांगितल्यानुसार, एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, लाल किल्ल्यातील घटनेनंतर एजन्सी अलर्ट मोडवर आहेत. खलिस्तानी गट त्यांच्या चळवळीला पुनरुज्जीवित करण्याच्या तयारीत आहेत, पण या सर्व घडामोडींवर सुरक्षा यंत्रणांचे लक्ष आहे. रिपोर्टनुसार, पाकिस्तानात बसलेले हँडलर पंजाबमधील दहशतवादी कारवायांसाठी त्यांच्या साथीदारांना सूचना देत आहेत. पण, मागील काही दिवसात राज्य पोलिसांच्या सहकार्याने असे अनेक कट उधळून लावण्यात आले आहेत.

एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “आम्हाला स्थानिक टोळ्यांचा समावेश आणि पाकिस्तानमध्ये ISI-समर्थित खलिस्तानी चळवळ पुन्हा सुरू झाल्याची विशिष्ट माहिती मिळाली होती. ही माहिती स्थानिक पोलिसांशी शेअर केली. यानंतर फरार किंवा जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांची यादी तयार करण्यासाठी संपूर्ण राज्यात कारवाई करण्यात आली. या कारवायादरम्यान अनेक कट उधळून लावण्यात आले आहेत.''

नोव्हेंबरमध्ये आर्मी कॅंटच्या गेटवर झालेला ग्रेनेड हल्ला हe देखील एक दहशतवादी कटाचा भाग होता. एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, “या वर्षी पंजाबजवळ सुमारे 42 ड्रोन पाहण्याची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. पाकिस्तानने ड्रोनच्या मदतीने टाकलेली स्फोटके आणि शस्त्रे राज्यात अशांतता निर्माण करण्यासाठी वापरली जाणार आहेत. याच पार्श्वभू राज्यातील सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आहेत.

मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त
गेल्या पाच महिन्यांत पंजाब पोलिसांनी सीमावर्ती शहरांमधून 7 टिफिन बॉम्ब आणि 10 हून अधिक हातबॉम्ब जप्त केले आहेत. ऑगस्टमध्येच पंजाब पोलिसांनी जर्नेल सिंग भिंद्रनवालेच्या पुतण्याचा मुलगा गुरुमुख सिंग याला अटक केली होती. त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. निवडणुकीपूर्वी मोठा कट घडवून आणण्यासाठी त्याला पाकिस्तानातील आयएसआय आणि इतर खलिस्तान समर्थित दहशतवादी गटांकडून मदत मिळत असल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
 

Web Title: Khalistani group involved in the Ludhiana court blast, reveals the intelligence agencies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.