शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
2
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
3
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
4
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
5
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
6
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
7
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
8
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
9
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
10
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
11
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
12
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
13
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
14
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
15
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
16
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
17
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
18
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
19
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
20
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
Daily Top 2Weekly Top 5

गुन्हेगारांवर खाकीचा दणका

By admin | Updated: January 30, 2016 00:17 IST

तीन दिवसात २३ गुंडांवर मकोका : गुन्हेगारी विश्वाला जबर हादरा

तीन दिवसात २३ गुंडांवर मकोका : गुन्हेगारी विश्वाला जबर हादरा
नागपूर : प्रचंड आक्रमक झालेल्या खाकीने गुन्हेगारांना जोरदार दणका दिला आहे. आधी संतोष आंबेकर, नंतर गोल्डी भुल्लर आणि आज राजू भद्रे टोळीवर पोलिसांनी मकोका लावला. अवघ्या तीन दिवसात शहरातील तीन मोठ्या गुंडांच्या टोळ्यांवर मकोकाची कारवाई झाल्यामुळे गुन्हेगारी विश्वाला जोरदार हादरा बसला आहे. राजू भद्रे तसेच त्याच्या टोळीतील आठ गुन्हेगारांवरील मकोकाची माहिती पोलीस उपायुक्त रंजन शर्मा यांनी आज सायंकाळी पत्रकारांना दिली.
११ डिसेंबरला अजय राऊतचे अपहरण केल्यानंतर त्याला आणि त्याच्या परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन १ कोटी ७५ लाखांची खंडणी गुंडांनी उकळली होती. अजय राऊतच्या मुलाचे अपहरण करण्याची धमकी दिल्यामुळे तो एवढी मोठी खंडणी दिल्यानंतरही गप्प बसला होता. मात्र, पोलिसांना वृत्तपत्रातून या प्रकरणाची माहिती कळली. त्यानंतर गुन्हेशाखेने राऊतची चौकशी सुरू केली. राऊतने दिलेल्या तक्रारीनंतर अपहरणकर्ते आणि खंडणी उकळणारांचा पोलिसांनी शोध घेतला. तेव्हा यात नितीन वाघमारे, आशिष नायडू, कार्तिक शिवरामक्रिष्णन तेवर आणि भरत ऊर्फ राहुल सुशिल दुबे हे गुंड गुन्हेशाखेच्या हाती लागले. त्यांनी या गुन्ह्याचे सूत्रधार दिवाकर कोतुलवार आणि राजू भद्रे असल्याचे सांगितले. अपहरण केल्यानंतर राऊतला मारहाण करून राजू भद्रेच्या घरामागच्या मठात नेले आणि तेथे त्याला मित्रांना फोन करायला लावून १ कोटी ७५ लाख रुपये मागवून घेतल्याचेही उघड झाले. ही पक्की माहिती उघड झाल्यामुळेच या टोळीविरुद्ध मकोकाची कारवाई करण्यात आल्याचे उपायुक्त शर्मा यांनी पत्रकारांना सांगितले. उपरोक्त चार आरोपी अटकेत आहेत. राजू भद्रे कारागृहात आहे तर दिवाकर कोतुलवार (वय ३१) त्याचा भाऊ आशिष कोतुलवार (वय २८), खुशाल ऊर्फ जल्लाद ऊर्फ पहेलवान थूल आणि नितीन मोहन पाटील हे फरार असल्याचे त्यांनी सांगितले.

--
मालमत्ता जप्त करणार..