शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षान्त समारंभाच्या पोशाखात खादीचे उपरणे

By admin | Updated: July 12, 2016 00:49 IST

मुंबई येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’चे (आयआयटी) विद्यार्थी आगामी दीक्षान्त समारंभात अंगावर खादीचे उपरणे (अंगवस्त्र) पांघरून आपापल्या पदव्या स्वीकारणार आहेत.

नवी दिल्ली : मुंबई येथील ‘इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी’चे (आयआयटी) विद्यार्थी आगामी दीक्षान्त समारंभात अंगावर खादीचे उपरणे (अंगवस्त्र) पांघरून आपापल्या पदव्या स्वीकारणार आहेत.मुंबई ‘आयआयटी’ने खादीचे उपरणे हा त्यांचा दीक्षान्त समारंभाचा पोशाख म्हणून स्वीकारला असल्याचे केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालयाने सोमवारी एका प्रसिद्धी पत्रकान्वये जाहीर केले आहे. दीक्षान्त समारंभाच्या वेळी विद्यार्थ्यांना अंगावर पांघरता यावीत, यासाठी आयआयटीने खादीच्या ३,५०० उपरण्यांसाठी ‘आॅर्डर’ दिल्याचेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे. ही उपरणी ‘हनी कोम्ब टॉवेल कॉटन खादी’ची असतील.मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार हे एक महत्त्वाचे पाऊल असून, खादीला जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात मानाचे स्थान प्राप्त होत असल्याचेच यावरून स्पष्ट होते. नरेंद्र मोदी सरकारने पारंपरिक वस्त्रोद्योगाचे पुनरुज्जीवन करण्यावर भर दिला असून, खादी त्याच्या केंद्रस्थानी आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘आकाशवाणी’वरील ‘मन की बात’ कार्यक्रमातही देशवासीयांना खादीचे कपडे वापरण्याचे आवाहन अनेकदा केले आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून किमान एक दिवस खादीचा पेहराव करून कार्यालयात यावे, असे परिपत्रक कार्मिक खात्यानेही मध्यंतरी काढले होते.हे सूत्र पकडून विद्यापीठ अनुदान आयोगाने जुलैमध्ये सर्व विद्यापीठांना व संलग्न महाविद्यालयांना एक परिपत्रक पाठवून दीक्षान्त समारंभांसह अन्य कार्यक्रमांच्या वेळी खादी आणि हातमागावर विणलेले कपडे वापरण्याची सूचना केली होती. गुजरात तंत्रज्ञान विद्यापीठाने त्यानंतर लगेचच दीक्षान्त समारंभासाठी खादीचा पोशाख वापरण्याचे ठरविले. (लोकमत न्यूज नेटवर्क)