परिवहन मंत्र्याचा फॅमिली ड्रामा! एका मुलीसोबत नको त्या अवस्थेत बेडरूममध्ये आढळले; बायकोचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2026 10:47 IST2026-03-10T10:46:59+5:302026-03-10T10:47:33+5:30

के.बी गणेश कुमार एक प्रमुख मल्ल्याळम फिल्म अभिनेता आणि अनुभवी राजकारणी आहेत. जे सध्या केरळ सरकारमध्ये परिवहन मंत्रिपदावर कार्यरत आहे.

Kerala Transport Minister K.B. Ganesh Kumar wife Bindu Menon makes serious allegations against him | परिवहन मंत्र्याचा फॅमिली ड्रामा! एका मुलीसोबत नको त्या अवस्थेत बेडरूममध्ये आढळले; बायकोचा दावा

परिवहन मंत्र्याचा फॅमिली ड्रामा! एका मुलीसोबत नको त्या अवस्थेत बेडरूममध्ये आढळले; बायकोचा दावा

तिरुअनंतपुरम - केरळच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. राज्याचे परिवहन मंत्री के.बी. गणेश कुमार यांच्या पत्नी बिंदू मेनन यांनी त्यांच्या पतीवर गंभीर आरोप लावले आहेत. के.बी गणेश कुमार यांच्यावर विश्वासघात, फोन ट्रॅकिंग आणि शारीरिक शोषणाचे खळबळजनक आरोपानंतर केरळमधील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात पोलिसांना तातडीने फोन केल्यानंतर बिंदू मेनन यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यात त्यांनी गेल्या आठवड्याच्या शेवटी त्यांच्या घरी घडलेल्या एका विचित्र घटनेचा उल्लेख केला.

बिंदू मेनन यांनी आरोप केले की, माझ्या पतीचे अनेक महिलांसोबत संबंध आहेत. ज्यामुळे कित्येक महिने मला वेगळे राहावे लागले. पती माझा फोन ट्रॅक करून माझ्यावरच त्यांनी वेगवेगळे आरोप केले. मागच्या शनिवारी मी घरी गेले होते, तेव्हा बेडरूममध्ये पाहिले असता पती के.बी गणेश कुमार यांना विचित्र अवस्थेत पाहिले. त्यांच्यासोबत एक मुलगी होती. मी फोटो आणि व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा मंत्र्‍याच्या आदेशावर त्यांच्या ड्रायव्हरने बळजबरीने माझा मोबाईल हिसकावून घेतला आणि आणखी एका कर्मचाऱ्याने मला जबरदस्तीने घराबाहेर काढून गेट बंद केले.

तसेच मी केरळची माजी डीजीपी, तिरुअनंतपुरम महापालिकेतील नगरसेवकाकडे मदतीसाठी संपर्क केला. जी माझी नातेवाईक आहे. तिच्या सल्ल्यानुसार मी पोलिसांच्या हेल्पलाईनला कॉल करून घडलेला प्रकार सांगितला. पोलीस घटनास्थळी पोहचले परंतु मंत्र्‍यांच्या दबावामुळे त्यांनी या घटनेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला असा आरोपही बिंदू मेनन यांनी लावला. 

मंत्र्‍यांनी फेटाळला आरोप

दरम्यान, हे आरोप राजकीय हेतूने केले जात आहेत. महिला मतदारांमध्ये दिशाभूल करून माझी बदनामी करण्याचा हा डाव आहे असं सांगत मंत्री के. बी गणेश कुमार यांनी पत्नीचा दावा फेटाळून लावला. मानसिक तणावात असलेले कुणीही ११२ नंबरवर कॉल लावून पोलिसांची संपर्क करू शकते. माझ्या खासगी आयुष्याचा लोकप्रतिनिधी म्हणून करत असलेल्या सामाजिक कामांवर परिणाम व्हायला नको. निवडणुकीच्या काळात माझ्याविरोधात कट रचला जात आहे. मी असक्षम आहे किंवा भ्रष्ट आहे असं ते सांगू शकत नाहीत. जेव्हा निवडणूक येते तेव्हा असे मुद्दे आणले जातात असंही मंत्री के.बी गणेश कुमार यांनी म्हटलं.

कोण आहे के.बी गणेश कुमार?

के.बी गणेश कुमार एक प्रमुख मल्ल्याळम फिल्म अभिनेता आणि अनुभवी राजकारणी आहेत. जे सध्या केरळ सरकारमध्ये परिवहन मंत्रिपदावर कार्यरत आहे. ते केरळ काँग्रेस (बी) पक्षाचे अध्यक्ष आहेत आणि २००१ पासून पथानापुरम मतदारसंघाचे आमदार आहेत. परिवहन मंत्री म्हणून त्यांच्या पहिल्या कार्यकाळात (२००१-२००३) ते त्यांच्या स्वच्छ प्रशासकीय प्रतिमेसाठी ओळखले जात होते. त्यांनी वन, क्रीडा आणि चित्रपट यासह अनेक महत्त्वाची खाती सांभाळली. त्यांच्या पहिल्या पत्नी यामिनी थैंकची यांच्याशी झालेल्या अत्यंत वादग्रस्त कायदेशीर घटस्फोटानंतरत्यांनी २०१४ मध्ये बिंदू मेननशी लग्न केले.
 

Web Title : केरल के मंत्री विवादों में: पत्नी ने बेडरूम में अफेयर का आरोप लगाया।

Web Summary : केरल के मंत्री के.बी. गणेश कुमार पर पत्नी बिंदू मेनन ने बेवफाई और दुर्व्यवहार का आरोप लगाया है। उन्होंने दावा किया कि उन्होंने उसे एक अन्य महिला के साथ आपत्तिजनक स्थिति में पाया। कुमार ने आरोपों से इनकार किया, इसे राजनीतिक साजिश बताया।

Web Title : Kerala Minister embroiled in scandal: Wife alleges affair in bedroom.

Web Summary : Kerala Minister K.B. Ganesh Kumar faces accusations of infidelity and abuse from his wife, Bindu Menon. She claims to have found him in a compromising situation with another woman. Kumar denies the allegations, citing a political smear campaign.