धक्कादायक! भारतातील हे राज्य घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत, परिस्थिती अशीच राहिली तर...
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 13:50 IST2025-01-13T13:50:19+5:302025-01-13T13:50:41+5:30
Kerala population: जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतातही असं एक राज्यं आहे जे घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहे. चांगली शिक्षणाची स्थिती, रोजगाराच्या उत्तम संधी आणि उच्च दरडोई उत्पन्न यामुळे या राज्यातील जीवनमान हे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत उत्तम असं आहे. तरीही या राज्यातील लोकसंख्या सातत्याने घटत आहे.

धक्कादायक! भारतातील हे राज्य घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत, परिस्थिती अशीच राहिली तर...
स्वातंत्र्योत्तर काळात भारताची लोकसंख्या ही झपाट्याने वाढत गेली आहे. आजघडीला भारत हा जगातील सर्वात मोठी लोकसंख्या असलेला देश बनला आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला लगाम घालणं हे देशासमोरील मोठं आव्हान बनलेलं आहे. दुसरीकडे जपान आणि युरोपमधील काही देश हे घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहेत. जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश असलेल्या भारतातही असं एक राज्यं आहे जे घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहे. चांगली शिक्षणाची स्थिती, रोजगाराच्या उत्तम संधी आणि उच्च दरडोई उत्पन्न यामुळे या राज्यातील जीवनमान हे देशातील इतर राज्यांच्या तुलनेत उत्तम असं आहे. तरीही या राज्यातील लोकसंख्या सातत्याने घटत आहे.
भारतातील देवभूमी समजलं जाणारं केरळ हे राज्य घटत्या लोकसंख्येमुळे चिंतीत आहे. २०२४ मध्ये केरळची लोकसंख्या ही ३ कोटी ६० लाख होती. तत्पूर्वी १९९१ मध्ये केरळची लोकसंख्या ही २ कोटी ९० लाख होती. म्हणजेच मागच्या ३५ वर्षांत केरळी लोकसंख्या ही जेमतेम ७० लाख एवढी वाढली. २०११ जनगणनेनुसार केरळची लोकसंख्या ही ३ कोटी ३४ लाख एवढी होती. म्हणजेच केरळ हे राज्य स्थिर लोकसंख्येचं उद्दिष्ट गाठण्यात जवळपास गाठलं आहे.
द हिंदू या वृत्तपत्रामधीस अहवालानुसार कोरोनाच्या साथीनंतर केरळमधील स्थिती अधिकच चिंताजनक बनली आहे. आधी राज्यामध्ये दरवर्षी ५ ते ५ लाख ५० हजार मुलांचा जन्म व्हायचा. मात्र २०२३ मध्ये हा आकडा घटून ३ लाख ९३ हजार २३१ एवढा खाली आला आहे. केरळच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं आहे. लोकसंख्येच्या बाबतीत केरळची स्थिती ही २०१८ नंतर वेगाने बिघडली आहे. अधिकृत आकडेवारीनुसार २०२१ मध्ये केरळमध्ये जन्मणाऱ्या मुलांची संख्या घटून ती ४ लाख १९ हजार ७६७ वर आली होती. आता २०२३ मधील समोर आलेली आकडेवारी अधिकच चिंताजनक आहे.
लोकसंख्या तज्ज्ञांच्या मते लोकसंख्या स्थिर ठेवण्यासाठी जननदर हा २.१ एवढाअसला पाहिजे. म्हणजेच प्रति महिला किमान २.१ मुले जन्माला आली पाहिजेत. केरळने हे लक्ष्य १९८७-८८ मध्येच साध्य केलं होतं. मागच्या तीन दशकांपासून केरळची लोकसंख्या स्थिर आहे. मात्र जन्माला येणाऱ्या मुलांची घटनी संख्या चिंता वाढवत आहे.
१९८७-८८ मध्ये केरळमधील जननदर हा २.१ होता. त्यानंतर तो सातत्याने घटत गेला. १९९१ मध्ये तो १.८ ते १.७ एवढा खाली आला. तर २०२० मध्ये तो १.५ वर आला. कर २०२३ मध्ये आणखी घटून १.३५ एवझा झाला. केरळमधील बहुतांश जोडपी ही केवळ एका मुलाला जन्म देत आहेत. तर काहींकडून मुलं जन्माला घातली जात नाहीत. त्यामुळे ही परिस्थिती कायम राहिली तर येत्या काळात केरळची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात घटू शकते.