शहरं
Join us  
Trending Stories
1
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
2
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
3
महाराष्ट्रात सहानुभूती आमच्या बाजूने, कारण...; PM मोदींनी दिला वेगळाच 'अँगल'
4
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
5
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
6
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे
7
अभिनेता लोकसभेच्या रिंगणात; चाहत्याची सेल्फी अन् झाले मोठे नुकसान, पिकला एकच हशा
8
खळबळजनक! लग्नानंतर 4 दिवसांनी नवरीचा मृत्यू; बाथरूममध्ये सापडला मृतदेह अन्...
9
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
10
Narendra Modi : "आरक्षण रद्द करण्याचा मार्ग आम्हाला कदापि मंजूर नाही", मोदी यांची सोलापुरात स्पष्टोक्ती
11
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
12
'३ इडियट्स'मधील रँचोच्या भूमिकेसाठी आमिर खान नव्हता पहिली पसंती, सिनेमा नाकारल्याचं अभिनेत्याला होतोय पश्चाताप
13
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
14
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
15
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
16
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
17
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
18
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
19
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
20
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!

नवजात बाळानं आईला दिला पुनर्जन्म

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 8:03 PM

व्हेटिंलेटरवर असलेली महिला जगू लागली सर्वसामान्य आयुष्य

तिरुअनंतपुरम: बाळाच्या जन्मानंतर आईला पुनर्जन्म मिळतो, असं म्हणतात. केरळमध्ये शब्दश: असाच एक प्रकार घडला आहे. मेंदूच्या दुखापतीमुळे व्हेंटिलेटरवर असलेल्या महिलेच्या प्रकृतीत प्रसूतीनंतर प्रचंड सुधारणा झाल्याचं दिसून आलं आहे. केरळमध्ये ही घटना चर्चेचा विषय ठरली आहे.जानेवारी महिन्यात बेटिना नावाच्या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांच्या मेंदूला दुखापत झाल्यानं शारीरिक हालचालींवर मर्यादा आल्या होत्या. बेटिना यांना अर्धांगवायूचा झटकादेखील आला होता. त्यावेळी त्या तीन महिन्यांच्या गर्भवती होत्या. यानंतर बेटिना यांना दोन महिने व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आणि मग त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं. बेटिना यांना जिवंत ठेवण्यासाठी दिल्या जाणाऱ्या औषधांचा पोटातील बाळावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो, अशी चिंता डॉक्टरांना सतावत होती. बेटिना घेत असलेल्या औषधांमुळे तिच्या पोटातील बाळाला आजार होऊ शकतो, असा इशारा डॉक्टरांनी तिला दिला होता. मात्र आश्चर्याची बाब म्हणजे, बेटिनाच्या औषधांचा बाळावर कोणताही परिणाम झाला नाही. 14 जून रोजी सर्जरीच्या माध्यमातून बाळाचा जन्म झाला. बाळाच्या वडिलांनी त्याचं नाव एल्विन असं ठेवलं. एल्विनच्या जन्मानंतर बेटिना कोमातून बाहेर आली. यानंतर तिनं बाळाला आपल्या कुशीतही घेतलं. कित्येक महिन्यानंतर प्रथमच बेटिनाच्या बोटांनी, डोळ्यांनी आणि संपूर्ण शरीरानं हालचाली केली. बाळाच्या जन्मानंतर बेटिना यांच्या प्रकृतीत प्रचंड सुधारणा झाली आणि 10 दिवसांनंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.  

टॅग्स :Keralaकेरळhospitalहॉस्पिटल