लग्नात अडथळा आणणाऱ्या शेजाऱ्याची दुकानं संतप्त तरुणाने जेसीबीने केली जमीनदोस्त

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 01:47 PM2020-10-29T13:47:51+5:302020-10-29T13:51:51+5:30

Kerala News : संतापाच्या भरात एका तरुणाने लग्नात आड येणाऱ्या  शेजाऱ्याची दुकाने जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त केली आहेत.

kerala man demolishes neighbour shop with jcb upset with stalling marriage proposals | लग्नात अडथळा आणणाऱ्या शेजाऱ्याची दुकानं संतप्त तरुणाने जेसीबीने केली जमीनदोस्त

लग्नात अडथळा आणणाऱ्या शेजाऱ्याची दुकानं संतप्त तरुणाने जेसीबीने केली जमीनदोस्त

Next

कन्नूर - एखाद्या व्यक्तीचं लग्न जमतं असेल तर काहीवेळा अनेक जण ते मुद्दाम होऊ नये यासाठी विविध अडचणी निर्माण करत असतात. अशीच घटना केरळमध्ये घडली आहे. कन्नूरमध्ये एक फिल्मी प्रकार पाहायला मिळाला आहे. संतापाच्या भरात एका तरुणाने लग्नात आड येणाऱ्या  शेजाऱ्याची दुकाने जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त केली आहेत. तरुणाचे कुटुंब आणि शेजाऱ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद होता. त्यामुळे तरुणाने असं पाऊल उचलल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी तरुणाच्या लग्नात वारंवार अडथळे आणत होता. त्यामुळे त्याने संतापाच्या भरात त्याची दुकाने जेसीबीने पाडली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. जेसीबीच्या साह्याने दुकाने पाडणाऱ्या 30 वर्षीय एल्बिन मॅथ्यू याने या घटनेचा व्हिडीओही तयार केला. शेजारीच्या दुकानांमध्ये अवैध धंदे सुरू होते. या दुकानांमध्ये अवैध दारू विक्री आणि जुगाराचा अड्डा चालवण्यात येत होता. त्यामुळे परिसरातील तरूण त्रस्त होते. तसेच लग्नासाठी प्रस्ताव येत होते. मात्र शेजारी त्यात अडथळे आणत होता असा आरोप तरुणाने केला आहे.

चेरुझुपाचा रहिवासी असलेल्या मॅथ्यूने दिलेल्या माहितीनुसार, अवैध दारू विक्री आणि जुगार अड्ड्यांसंबंधी वारंवार तक्रार करूनही पोलीस आणि प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. अखेर आम्हालाच पुढाकार घेऊन हे पाऊल उचलावे लागले. शेजारी असूनही दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद होते. तर दुसरीकडे शेजाऱ्याने मॅथ्यूचे सर्व आरोप फेटाळले आहेत. या घटनेची पोलिसांनी दखल घेतली आहे. जेसीबीच्या साह्याने दुकाने पाडणाऱ्या मॅथ्यूला अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर बेकायदा दुकाने पाडल्याचा आरोप आहे. 

Web Title: kerala man demolishes neighbour shop with jcb upset with stalling marriage proposals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.