शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

रेशन, मोदींचे फोटो अन् 'भाजपा'चा प्रचार! केरळ सरकारने केंद्र सरकारचा आदेश धुडकावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2024 12:33 IST

सत्ताधारी भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत येणार असल्याचा दावा भाजपासह एनडीएचे घटक पक्ष करत आहेत.

Lok Sabha Election 2024: लोकसभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'अब की पार ४०० पार'चा नारा दिला. सर्वच राजकीय पक्ष आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पावले टाकत आहेत. सत्ताधारी भाजपा तिसऱ्यांदा सत्तेत येणार असल्याचा दावा भाजपासह एनडीएचे घटक पक्ष करत आहेत. अलीकडेच मोदींनी सांगितले की, एनडीए ४०० पार तर भाजपा ३७० हून अधिक जागा जिंकेल. भाजपाकडून मोर्चेबांधणी सुरू असताना केरळ सरकारने केंद्र सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. केरळमधील पिनाराई विजयन सरकारने जाहिरातींवरून सरकारच्या भूमिकेला विरोध दर्शवला. 

मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्या नेतृत्वातील सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. केरळमधील रेशन दुकानांवर राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याच्या लोगोसह असलेले मोदींचे फोटो, बॅनर्स लावणे जाणार नाहीत. केंद्र सरकारच्या निर्देशाचे पालन करणार नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले. मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत आमदार पी. अब्दुल हमीद यांच्या प्रश्नाला उत्तर देताना यावर शिक्कामोर्तब केला. लोकसभा निवडणूक जवळ आल्याने सरकार रेशन दुकानांवर जाहिरात लावून प्रचार करत आहे, त्यांच्या प्रचाराचा हा एक भाग असल्याने आम्ही विरोध केला, असेही विजयन यांनी सांगितले. 

जाहिरातींवरून राजकारण मुख्यमंत्री विजयन म्हणाले की, लोकसभा निवडणूक तोंडावर असल्याने ही योजना राबवली जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो असलेल्या पिशव्या, बॅनर्स लावून भाजपा प्रचार करत आहे. याला आम्ही शक्य तेवढा विरोध करू आणि हे चुकीचे असल्याचे केंद्र सरकारच्या निदर्शनास आणण्याचा प्रयत्न करू. निवडणूक आयोगाशी देखील याबाबत चर्चा करता आली तर त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. 

केंद्राचे निर्देश काय आहेत?केरळमधील १४ हजारहून अधिक रेशन दुकानांवर पंतप्रधान मोदींचा फोटो असलेले फ्लेक्स आणि बॅनर लावावा अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक रेशन दुकानाबाहेर मोदींचे फोटो असलेले बॅनर्स आणि त्यांनी राबवलेल्या योजनेची माहिती नमूद असायला हवी, अशी केंद्र सरकारची सूचना असल्याचे केरळचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री जी.आर. अनिल यांनी सांगितले. 

टॅग्स :KeralaकेरळCentral Governmentकेंद्र सरकारlok sabhaलोकसभाBJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदी