Kerala 2 Navy officers killed after glider crashes in Kochi | नौदलाच्या ग्लायडरला भीषण अपघात, दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

नौदलाच्या ग्लायडरला भीषण अपघात, दोन अधिकाऱ्यांचा मृत्यू

नवी दिल्ली - केरळच्या कोचीमध्ये नौदलाच्या ग्लायडरला भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात दोन नौदल अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. नौदलाने दिलेल्या माहितीनुसार, केरळच्या कोची जिल्ह्यात रविवारी (4 ऑक्टोबर) सकाळी थोप्पुम्पदी पूलाजवळ एका ग्लायडरला अपघात झाला. या अपघातात लेफ्टनंट राजीव झा (39) आणि पेटी ऑफिसर सुनील कुमार (29) यांचा मृत्यू झाला आहे. 

कोची येथील नौदलाच्या बेसवरून पॉवर ग्लायडरने लेफ्टनंट राजीव झा आणि सुनील कुमार हे रवाना झाले होते. नियमित प्रशिक्षणादरम्यान आयएनएस गरुडवरुन आकाशात झेप घेतलेल्या ग्लायडरला अपघात झाला. या दुर्घटनेत दोन्ही अधिकारी गंभीर जखमी झाले असल्याने त्यांना तातडीने आयएनएचएस संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केलं आहे. नौदलाने या प्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Kerala 2 Navy officers killed after glider crashes in Kochi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.