In Kerala, 15 people were killed and 56 others were trapped under the rubble | केरळात दरड कोसळून १५ ठार, ५६ जण ढिगाऱ्याखाली अडकले

केरळात दरड कोसळून १५ ठार, ५६ जण ढिगाऱ्याखाली अडकले

इदुक्की (केरळ) : केरळमधील मुन्नार या पर्यटकांच्या लोकप्रिय शहराजवळ असलेल्या एका चहाच्या मळ्यात कामगारांच्या निवासी चाळींवर शुक्रवारी पहाटे प्रचंड मोठी दरड कोसळून किमान १५ जण झोपेतच मृत्युमुखी पडले. माती व दगडांच्या ढिगाऱ्यांखाली आणखी किमान ५६ लोक दबलेले असावेत, अशी भीती व्यक्त करण्यात येत असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

मुन्नार शहराला लागूनच असलेल्या कानन देवन हिल प्लान्टेशन कंपनीच्या न्यायमकड चहामळ््यात ही दुर्घटना घडली. हा चहामळा पेत्तीमुडी डोंगराच्या उतारावर व त्याखालील सखल भागात आहे. डोंगराच्या पायथ्याशी कामगारांची वसाहत आहे. गेले दोन दिवस होत असलेल्या मुसळधार पावसाने भूस्खलन होऊन या डोंगराचा खूप मोठा भाग निखळून खाली कामगारांच्या चाळींवर व आसपासच्या वसाहतींवर कोसळला. हे भूस्खलन एवढे प्रचंड होते की, कामगारांच्या चार चाळी व व त्यांशेजारी असलेले एक चर्च पूर्णपणे गाढले गेले. त्याखाली आणखी किमान ८० जण अडकलेले असावेत, असा अंदाज आहे. शनिवार दुपारपर्यंत माती व दगडांच्या ढिगाºयांखालून १५ मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. त्यात सहा महिला व तीन मुलांचा समावेश होता. याखेरीज आणखी १० जखमींनाही ढिगाºयांखालून काढून इस्पितळांत पाठविण्यात आले. रस्तामार्ग व दूरसंचार साधनेही बंद पडल्याने हवाईदलाने मदतीसाठी हेलिकॉप्टर पाठवावी, अशी विनंती केरळचे मुख्यमंत्री पिनाराय विजयन यांनी केली. (वृत्तसंस्था)

पूल वाहून गेला
या चहामळ्याकडे येणाºया एकमेव रस्त्यावर असलेला कन्निमला नदीवरील पेरियावर पूल पुरामुळे वाहून गेल्याने मदत आणि बचाव पथकांना दुर्घटनास्थळी तातडीने पोहोचणे मुश्कील झाले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: In Kerala, 15 people were killed and 56 others were trapped under the rubble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.