केजरीवाल-मोदी संघर्षाला भाजप का घाबरतो?

By Admin | Updated: May 25, 2015 00:48 IST2015-05-25T00:48:19+5:302015-05-25T00:48:19+5:30

दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबत केंद्राने मोठी कोलांटउडी(यू-टर्न)घेतल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे

Kejriwal-Modi's struggle is afraid of BJP? | केजरीवाल-मोदी संघर्षाला भाजप का घाबरतो?

केजरीवाल-मोदी संघर्षाला भाजप का घाबरतो?

नवी दिल्ली : दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याबाबत केंद्राने मोठी कोलांटउडी(यू-टर्न)घेतल्याचा आरोप दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात थेट संघर्षाला भाजप का घाबरतो? असा सवालही त्यांनी केला. केजरीवाल यांच्या सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानिमित्त रविवारी त्यांनी दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्याशी सुरू असलेल्या वादाकडे लक्ष वेधले.
दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याचे आश्वासन केंद्राने गेल्यावर्षी दिले होते. मात्र, त्यापासून पूर्णपणे यू-टर्न घेतला आहे. जंग यांनी प्रशासनाचा ताबा घेण्याचे प्रयत्न चालविल्यामुळे निर्माण झालेल्या वादाबद्दल त्यांनी टिष्ट्वटरवर संदेश भूमिका मांडली. दरम्यान, महिलांच्या सुरक्षेसाठी शहर बसगाड्यांमध्ये २,५०० मार्शल तैनात करण्याचा निर्णय सरकारने रविवारी घेतला. (लोकमत न्यूज नेटवर्क)


 

Web Title: Kejriwal-Modi's struggle is afraid of BJP?