११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2025 14:45 IST2025-11-10T14:45:14+5:302025-11-10T14:45:28+5:30
दहशतवाद्यांनी लखनौमधील आरएसएस कार्यालयाची रेकी केली होती. दिल्लीतील आझादपूर मंडी देखील लक्ष्य होतं.

११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
गुजरातमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांबद्दल एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. दहशतवाद्यांनी लखनौमधील आरएसएस कार्यालयाची रेकी केली होती. दिल्लीतील आझादपूर मंडी देखील लक्ष्य होतं. कट रचणाऱ्या दहशतवाद्यांनी आरएसएस कार्यालयाचा व्हिडीओ बनवला होता आणि तो पाकिस्तानमधील त्यांच्या लोकांना पाठवला होता. या संदर्भात केमिकल वेपन्सचा वापर करून दहशतवादी हल्ल्याची योजना आखणाऱ्या एका डॉक्टरसह तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेला दहशतवादी मुझम्मिल अल फलाह विद्यापीठात शिकवत होता.
गुजरात एटीएसने तीन दहशतवाद्यांना अटक केली होती, त्यापैकी दोन उत्तर प्रदेशचे आणि एक हैदराबादचा होता. या काळात काश्मीरमध्येही सर्वात मोठा दहशतवादी हल्ला झाला. ४८ तासांच्या छाप्यात १० हून अधिक जिल्ह्यांमधील ५९ ठिकाणी १० जणांना अटक करण्यात आली. पुलवामापासून शोपियां, जम्मू, गंदरबल, किश्तवाड आणि कुलगामपर्यंत, दहशतवाद्यांच्या मदतनीसांवर कडक कारवाई करण्यात आली.
सुरक्षा यंत्रणांना माहिती मिळाली होती की, जम्मू आणि काश्मीरला पुन्हा लक्ष्य करण्याची तयारी सुरू आहे. लष्कर-ए-जैश-ए-हिजबुल मुजाहिदीन (एलजेबी) आणि जमात-ए-इस्लामी (जेआय) यांनी दहशतवादी हल्ल्यांची योजना आखली आहे. पीओकेमध्ये हल्ल्यांची योजना आखण्यासाठी ऑक्टोबरमध्ये गुप्तचर यंत्रणांची बैठक झाली. दहशतवादी संघटनांचे स्लीपर मॉड्यूल एक्टिव्ह करण्याचे निर्देश देण्यात आले. ऑपरेशन सिंदूर दरम्यान झालेल्या नुकसानाचा बदला घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या.
या माहितीनंतर दहशतवादी नेटवर्क उध्वस्त करण्यासाठी आणि दहशतवाद्यांच्या योजना उधळून लावण्यासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात छापे टाकण्यात आले. या संदर्भात, दहशतवाद्यांशी संबंध असल्याबद्दल जम्मू आणि काश्मीर पोलिसात तैनात असलेल्या दोन विशेष पोलिस अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. दोघांवरही दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा आणि दहशतवाद्यांशी थेट संपर्कात असल्याचा आरोप आहे.