Karti Chidambaram granted bail | कार्ती चिदंबरम यांना जामीन मंजूर 
कार्ती चिदंबरम यांना जामीन मंजूर 

नवी दिल्ली - माजी वित्तमंत्री पी. चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी मोठा दिलासा मिळाला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने चिदंबरम यांना जामीन मंजूर केला आहे. चिदंबरम यांना दहा लाख रुपयांच्या हमीवर जामीन मंजूर करण्यात आला आहे. 
कार्ती चिदंबरम यांच्यावर शीना बोरा हत्याकांडातील आरोपी पीटर मुखर्जी आणि इंद्राणी मुखर्जी यांच्या आयएनएक्स मीडिया या कंपनीला 2007मध्ये नियमापेक्षा अधिक विदेशी गुंतवणूक मिळवून दिल्याचा आरोप आहे. कंपनीला फक्त 4.62 कोटींची विदेश गुंतवणूक करण्याची परवानगी असताना त्यांनी 305 कोटी रुपये उभे केले होते. कार्ती चिदंबरम यांनी आपल्या वडिलांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोपही लावण्यात आला होता.  
 
 

English summary :
Former Finance Minister P. Chidambaram's son Karti Chidambaram has received a big relief in the INX media issue. The Delhi High Court has granted bail to Chidambaram


Web Title: Karti Chidambaram granted bail
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.