Karti Chidambaram in Chennai: It (arrest of P Chidambaram by CBI) is being done just to divert attention from the issue of #Article370. | 'कलम 370 वरील लक्ष हटविण्यासाठीच अटक', पिताच्या अटकेनंतर पुत्र कार्ती दिल्लीकडे रवाना
'कलम 370 वरील लक्ष हटविण्यासाठीच अटक', पिताच्या अटकेनंतर पुत्र कार्ती दिल्लीकडे रवाना

ठळक मुद्देचिदंबरम यांच्या अटकेनंतर प्रथमच पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. तब्बल 10 ते 12 तास मी सातत्याने चौकशीला गेलो आहे. मात्र, अद्याप माझ्याविरुद्ध कुठलंही दोषारोपपत्र दाखल झालेलं नाही.

नवी दिल्ली - आयएनएक्स मीडिया प्रकरणात अंतरिम जामीन फेटाळल्यानंतर पी. चिदंबरम यांना सीबीआयने बुधवारी रात्री उशिरा अटक केली आहे. जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानातून त्यांना अटक करण्यात आली. २७ तासानंतर पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन त्यांची बाजू मांडली. त्यानंतर ते जोरबाग येथील निवासस्थानी पोहचले. याठिकाणी सीबीआयची टीम दाखल झाली. विशेष म्हणजे चिदंबरम यांना अटक करण्यासाठी १ तासांपासून सीबीआयचे अधिकारी चिदंबरम यांच्या घरात ठाण मांडून बसले. 

चिदंबरम यांच्या अटकेनंतर प्रथमच पी चिदंबरम यांचे पुत्र कार्ती चिदंबर यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. केवळ 370 प्रकरणावरुन लोकांच लक्ष हटविण्यासाठी सरकारने माझ्या वडिलांना अटक केल्याचं कार्ती यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पक्षाची आणि पी चिंदंबरम यांची प्रतिमा मलिन करण्याचा सरकारचा डाव आहे. याप्रकरणाला विनाकारण मोठं बनविण्यात आलं आहे, ज्यामध्ये चिदंबरम यांचा काहीही संबंध नाही. मलाही सीबीआयने 4 ते 5 वेळा नोटीस बजावली होती. मी सीबीआयचा पाहुणाच बनलो होतो. तब्बल 10 ते 12 तास मी सातत्याने चौकशीला गेलो आहे. मात्र, अद्याप माझ्याविरुद्ध कुठलंही दोषारोपपत्र दाखल झालेलं नाही. त्यामुळे, आम्ही कायदेशीर आणि राजकीय मार्गाने आमचा लढा सुरूच ठेऊ असे कार्ती चिदंबरम यांनी म्हटले आहे. चेन्नईवरुन दिल्लीला जाण्यापूर्वी कार्ती यांनी चेन्नई विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. दरम्यान, सीबीआयने पी चिदंबरम यांची कसून चौकशी करताना, आयएनएक्स मीडिया, पीटर मुखर्जी, इंद्राणी मुखर्जी यांच्याबद्दलही प्रश्न केले आहेत. 


सीबीआयची टीम पी. चिदंबरम यांच्या घरी दाखल झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्तेही मोठ्या संख्येने चिदंबरम यांच्या घराबाहेर जमा झाले होते. नरेंद्र मोदी सरकार सत्तेचा दुरुपयोग करून चिदंबरम यांना अडकविण्याचे प्रयत्न करत आहे असा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला. सीबीआयचे मुख्य संचालकही पी. चिदंबरम यांच्या घरी दाखल झाले. कार्यकर्त्यानी मोदी विरोधात घोषणाबाजी केली. पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड केली. यादरम्यान पोलिसांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली.  
२७ तासांनंतर बेपत्ता झालेले पी. चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली. या पत्रकार परिषदेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पी. चिदंबरम यांनी आयएनएक्स प्रकरणात मी कधीही आरोपी नव्हतो. माझ्यावर कोणतंही आरोपपत्र दाखल झालं नाही, असा दावा केला आहे. ही पत्रकार परिषद संपल्यानंतर पी. चिदंबरम हे जोरबाग येथील त्यांच्या निवासस्थानी पोहचले. त्यानंतर काही वेळातच सीबीआयची टीमही त्यांच्या घरी दाखल झाली होती. 

दरम्यान, सीबीआय किंवा ईडीने कोणतंही आरोपपत्र दाखल केलेलं नाही, माझा मुलभूत हक्क हिरावला जातोय. मागील २७ तासांपासून अनेक भ्रम पसरविले जात आहेत. मी आणि माझं कुटुंब यात दोषी नाही. कोणत्याही आरोपपत्रात माझं नाव नाही. सुप्रीम कोर्टात याबाबत अटकपूर्व जामीनासाठी अर्ज केला आहे. शुक्रवारी याबाबत सुनावणी होईल. गेल्या २७ तासांत वकिलांसोबत पुढील लढण्याची तयारी करत होतो. रात्रभर कागदपत्रे तयार केली जात होती. तपास यंत्रणांही कायद्याचं पालन केलं पाहिजे असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे. 
 

English summary :
P. Chidambaram arrested by the CBI late on Wednesday night (21 August 2019) after the interim bail was rejected in the connection with INX media case. He was arrested from his residence in Jorbagh. P. Chidambaram's son Karti Chidambaram has interacted with the media. Karti has said that the government has arrested his father to divert people's attention from only 370 cases.


Web Title: Karti Chidambaram in Chennai: It (arrest of P Chidambaram by CBI) is being done just to divert attention from the issue of #Article370.
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.