Karnataka's rebel MLAs stand by on decision to not go in assembly | 'आमचं ठरलंय'; कर्नाटकच्या बंडखोर आमदारांचा निर्धार भाजपाला फळणार!
'आमचं ठरलंय'; कर्नाटकच्या बंडखोर आमदारांचा निर्धार भाजपाला फळणार!

मुंबई : कर्नाटकातील राजकीय संकटावर उद्या चित्र स्पष्ट होणार असून बंडखोर आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. तसेच आमचेही ठरले असल्याचे सांगत उद्याच्या कुमारस्वामी सरकारच्या बहुमत चाचणीवेळची भूमिकाही स्पष्ट केली आहे. 

कर्नाटक विधानसभेमध्ये कुमारस्वामी सरकार बहुमत सिद्ध करणार आहे. त्याआधी सर्वोच्च न्यायालयाने बंडखोर आमदारांच्या याचिकेवर निर्णय देताना आमदारांना चाचणीवेळी उपस्थित राहण्यास जबरदस्ती करू शकत नसल्याचे म्हटले होते. तसेच विधानसभा अध्यक्षांनाही राजीनामे मंजूर करण्यासाठी वेळेचे बंध न टाकू शकत नसल्याचे म्हटले होते. यामुळे उद्या होणाऱ्या बहुमत चाचणीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. 

काँग्रेस आणि जेडीएसने उद्या आमदारांना उपस्थित राहण्यासाठी तीन ओळींचा व्हीप जारी केला आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्णयामुळे हा व्हीप बंडखोर आमदारांना लागू होणार नाही. यामुळे मुंबईतील रेनेसॉन हॉटेलमध्ये थांबलेल्या या आमदारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करत आपली भूमिका स्पष्ट केले आहे. 
आम्ही सर्व आमदार सोबत आहोत. आमचा निर्णय ठाम आहे यामुळे उद्या विधानसभेमध्ये जाण्याचा प्रश्नच येत नाही, असे बंडखोर आमदारांनी सांगितले. 

कर्नाटकमध्ये काँग्रेसचे 79, जेडीएसचे 37 आणि बसपा 1 असे 117 बहुमत होते. तर भाजपाकडे 105, अपक्ष 1 आणि केपीजेपीचा 1 असे 107 मते आहेत. यापैकी काँग्रेसच्या 13 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी या बंडखोर आमदारांचे राजीनामे बहुमत चाचणीच्या आधी मंजूर केले नाहीत तर हे आमदार अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. चाचणीवेळी कुमारस्वामी सरकार अल्पमतात असणार आहे. भाजपा 107 विरुद्ध 101 मतांनी जेडीएस-काँग्रेसवर मात करेल. 

काँग्रेस-जेडीएसनं 'ती' खेळी केल्यास महाराष्ट्रासोबतच कर्नाटकातही निवडणूक! वाचा सविस्तर 

भाजपला फायद्याचे कसे?
कर्नाटकमध्ये काँग्रेसचे 79, जेडीएसचे 37 आणि बसपा 1 असे 117 बहुमत होते. तर भाजपाकडे 105, अपक्ष 1 आणि केपीजेपीचा 1 असे 107 मते आहेत. यापैकी काँग्रेसच्या 13 आणि जेडीएसच्या 3 आमदारांनी राजीनामे दिले आहेत. विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार यांनी या बंडखोर आमदारांचे राजीनामे बहुमत चाचणीच्या आधी मंजूर केले नाहीत तर हे आमदार अनुपस्थित राहण्याची शक्यता आहे. चाचणीवेळी कुमारस्वामी सरकार अल्पमतात असणार आहे. भाजपा 107 विरुद्ध 101 मतांनी जेडीएस-काँग्रेसवर मात करेल.  

Web Title: Karnataka's rebel MLAs stand by on decision to not go in assembly
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.