मशिंदींवरील लाऊडस्पीकरवर रात्री १० ते सकाळी ६ बंदी; कर्नाटक वक्फ बोर्डाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2021 12:44 PM2021-03-17T12:44:34+5:302021-03-17T12:49:14+5:30

Karnataka : लाऊडस्पीकरचा वापर केवळ अजान आणि अन्य महत्त्वाच्या गोष्टींसाठीच करण्यात यावा, असंही पत्रकात करण्यात आलं नमूद

Karnataka Waqf Board bars use of loudspeakers between 10 pm to 6 am during azaan | मशिंदींवरील लाऊडस्पीकरवर रात्री १० ते सकाळी ६ बंदी; कर्नाटक वक्फ बोर्डाचा निर्णय

मशिंदींवरील लाऊडस्पीकरवर रात्री १० ते सकाळी ६ बंदी; कर्नाटक वक्फ बोर्डाचा निर्णय

Next
ठळक मुद्देलाऊडस्पीकरचा वापर केवळ अजान आणि अन्य महत्त्वाच्या गोष्टींसाठीच करण्याच्या सूचनावक्फ बोर्डाच्या पार पडलेल्या ३२७ व्या बैठकीत घेण्यात आला निर्णय

कर्नाटक वक्फ बोर्डानं राज्यातील सर्व मशिदी आणि दरग्यांमध्ये रात्री १० ते सकाळी ६ यादरम्यान लाऊडस्पीकरचा वापर न करण्याबाबत पत्रक जारी केलं आहे. लाऊडस्पीकरच्या आवाजामुळे लोकांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचं या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. ९ मार्च रोजी कर्नाटक वक्फ बोर्डानं हे पत्रक जारी केलं आहे. रात्री १० वाजल्यापासून सकाळी ६ वाजेपर्यंत लाऊडस्पीकरचा वापर करता येणार नाही असं पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. १९ डिसेंबर २०२० रोजी वक्फ बोर्डाच्या पार पडलेल्या ३२७ व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला होता. 

वक्फ बोर्डाच्या या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. या पत्रकात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारच्या दरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयाचाही उल्लेख करण्यात आला आहे. जुलै २०१७ मध्ये त्या आदेशाद्वारे मशिदी आणि दरग्यांना ध्वनी प्रदुषणाशी निगडीत नियमांचंही पालन करण्याचे निर्देश देण्यात आले होते.

केवळ अजान, आवश्यक घोषणांसाठी वापर

 लाऊडस्पीकरचा वापर केवळ अजान आणि आवश्यक घोषणांसाठईच करण्यात यावा. सामान्य घोषणांसाठी लाऊडस्पीकरचा वापर करण्यास मनाई असेल, असंही या पत्रकात नमूद करण्यात आलं आहे. या पत्रकावर काही मशिंदींनी आक्षेप घेतला आगे. आपल्यासाठी सकाळचं नमाज पठण आवश्यक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. बंगळुरूच्या खतीब-ओ-इमाम मशिदीचे मकसूद इम्रान यांनी आपल्याला हे पत्रक मिळाल्याचं म्हटलं आहे. परंतु त्यांनी सकाळचं नमाज पठण महत्त्वाचं असल्याचं सांगत वक्फ बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे यात बदल करण्याची मागणी केली आहे.

Web Title: Karnataka Waqf Board bars use of loudspeakers between 10 pm to 6 am during azaan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.