कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 21:22 IST2025-11-27T21:20:48+5:302025-11-27T21:22:09+5:30
डीके शिवकुमार यांच्या पोस्टला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्दरमैया यांनी लिहिले, "जोपर्यंत एखादा शब्द लोकांसाठी जग अधिक चांगले बनवत नाही, तोपर्यंत शब्दाला ताकद नाही."

कर्नाटक सत्तासंघर्ष : "जनादेश एका क्षणाचा नाही तर पाच वर्षांचा..."; CM-DCM यांचं वाक्युद्ध
कर्नाटकातकाँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरून सुरू झालेला संघर्ष आता उघडपणे समोर आला आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांनी केलेल्या 'शब्दाची ताकद, हीच जगाची ताकद आहे', या सोशल मीडिया पोस्टला मुख्यमंत्री सिद्दरमैया यांनी प्रत्युत्तर दिले आहे. यानंतर, काँग्रेसमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे.
डीके शिवकुमार यांच्या पोस्टला उत्तर देताना मुख्यमंत्री सिद्दरमैया यांनी लिहिले, "जोपर्यंत एखादा शब्द लोकांसाठी जग अधिक चांगले बनवत नाही, तोपर्यंत शब्दाला ताकद नाही."
जनादेश एका क्षणाचा नाही... -
मात्र, सिद्दरमैया यांनी नंतर आपले विदान घमवून घेत, "कर्नाटकच्या जनतेने दिलेला जनादेश एका क्षणाचा नाही, ती एक जबाबदारी आहे, जी पूर्ण पाच वर्षांपर्यंत चालते. मी ज्या काँग्रेस पक्षाचा सदस्य आहे, तो लोकांच्या भल्यासाठी सातत्याने धैर्याने काम करतो. कर्नाटकसाठी दिलेले आमचे वचन हा कोणताही नारा नाही, ते आमच्यासाठी विश्व आहे."
'रोटेशनल मुख्यमंत्री' वादातून तणाव
'शब्दा'चा हा वाद, स्पष्टपणे 'रोटेशनल मुख्यमंत्री' करण्याच्या कथित आश्वासनातून निर्माण झाला आहे. डीके शिवकुमार यांच्या टीमने दावा केला आहे की, पक्षाच्या हायकमांडने हे आश्वासन दिले आहे. दुसरीकडे, सिद्दरमैया यांनी असे कोणतेही आश्वासन दिले नसल्याचा दावा केला आहे, तर केंद्रीय नेतृत्वाने या संपूर्ण प्रकरणावर मौन बाळगले आहे.