शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्पन्न वाढवण्याचा 'मोदी मंत्र'! पंतप्रधानांचा शेतकऱ्यांना सल्ला; ३५,४४० कोटी रुपयांच्या दोन मोठ्या योजना सुरू
2
भारतावर टीका करणाऱ्यांवर डोनाल्ड ट्रम्प खुश; पाकिस्तानच्या जनरलचं पुन्हा कौतुक केलं
3
आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील, कुटुंबात आनंदी वातावरण राहील!
4
कामगारांसाठी आनंदवार्ता! आता पीएफमधून १००% रक्कम काढता येणार, 'ईपीएफओ'चा निर्णय
5
ड्रॅगनच्या डॅम योजनेला भारत मोठी टक्कर देणार! मोदी सरकारनं तयार केला 77 बिलियन डॉलरचा 'मास्टर प्लॅन'
6
अखेर युद्ध थांबले; हमास-इस्रायल शांतता प्रस्ताव अमलात; २० इस्रायली ओलिसांची सुटका; २ हजार पॅलेस्टाइन बंदिवानही सोडले
7
खड्यांमुळे मृत्यू, तर कुटुंबाला ६ लाख भरपाई; रस्त्यांवरील खड्यांना अधिकारी, कंत्राटदार जबाबदार : उच्च न्यायालय
8
संपूर्ण मुंबईतील वाहतूककोंडी अखेर फुटणार; तब्बल ७० किमी भुयारी मार्गांचे जाळे उभारणार
9
चंद्रशेखरन यांच्या नेतृत्वावर पुन्हा विश्वास; टाटा समूहाचा निवृत्ती धोरणापलीकडचा विचार; टाटा सन्सची मंजुरी अपेक्षित
10
टाटा कॅपिटलची शेअर बाजारात एन्ट्री; मूल्यांकन १.३८ लाख कोटी
11
"मी युद्ध सोडवण्यात तज्ज्ञ..." पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमा वादावर ट्रम्प यांचं भाष्य!
12
अभ्यासाला लागा! दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा जाहीर, असं आहे वेळापत्रक 
13
राज्यासमोर मोठं संकट! जगभरात थैमान घालणाऱ्या आजाराचा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ
14
SA W vs BAN W : निर्णायक षटकात अख्तरची धुलाई; रंगतदार सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं मारली बाजी
15
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती एकत्रित लढणार!
16
४८ तासात 'सोनेरी सफर'च्या दोन घटना उघड , रेल्वेच्या तपास यंत्रणा खडबडून जाग्या 
17
डिस्काउंटचा धमाका! १० हजारांपेक्षा कमी किंमतीत मिळतायेत 'हे' जबरदस्त फोन
18
६००० रुपयांचा बोनस आणि...; एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी तिप्पट गोड!
19
Video: आधी कानाखाली मारल्या, नंतर धरली मान; मॅच सुरू असतानाच स्टेडियमध्ये 'बाई, काय हा प्रकार'
20
ठाणे-वसईकरांचे हाल! घोडबंदर मार्गावर चार-चार तास वाहतूक कोंडी

कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल 2019: कर्नाटक 'कमळा'ला पावणार की पुन्हा पडत्या काळात काँग्रेसला तारणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2019 08:21 IST

Karnataka Lok Sabha Election Results Live Vote Counting: आणीबाणी लादल्यानंतर आलेल्या विरोधी लाटेत इंदिरा गांधींना तेव्हा कर्नाटकने साथ दिली होती.

बंगळुरु : काँग्रेसच्या पडत्या काळात धावून जाणारे राज्य म्हणून कर्नाटकला ओळखले जाते. या ठिकाणी इंदिरा गांधी, सोनिया गांधींनी लोकसभा निवडणूक लढविली आणि जिंकली आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांतील काँग्रेसच्या राज्य सरकारविरोधातील राग यंदाच्या लोकसभा निवडणुकीतही निघण्याची शक्यता आहे. कर्नाटकमध्ये लोकसभेच्या 28 जागा आहेत. यापैकी 2014 मध्ये भाजपाला 17, काँग्रेसला 9 आणि जेडीएसला 2 जागा मिळाल्या होत्या. महत्वाचे म्हणजे यंदा काँग्रेस आणि जेडीएसमध्ये आघाडी असून याचा फायदाही काँग्रेसला होण्य़ाची शक्यता आहे.गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस सरकारला मतदारांनी नाकारले होते. मात्र, भाजपालाही स्पष्ट बहुमत न मिळाल्याने काँग्रेस आणि जेडीएसने आघाडी करत सत्ता स्थापन केली होती. मात्र, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्रीपद सोडावे लागल्याने आणि मंत्रीमंडळ विस्तारामध्ये स्थान न मिळाल्याचा राग काँग्रेसच्या नेत्यांमध्ये होता. ही नाराजी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निघण्याची शक्यता आहे. या नाराजीचा फायदा मुख्यमंत्रीपदासाठी उतावीळ असलेले भाजपाचे माजी मुख्यमंत्री बीएस येडीयुराप्पा यांनी उठविला आहे. गेल्या काही काळापासून त्यांनी जास्तीत जास्त खासदार भाजपाचे आल्यास कर्नाटकातील सरकार पडणार असल्याची वक्तव्ये केली होती. तसेच मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी त्यांच्यावर आमदारांना करोडो रुपयांनी ऑफर दिल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर आणीबाणीनंतर इंदिरा गांधी आणि अटलबिहारी वाजपेयींच्या काळात सोनिया गांधी यांना हात देणाऱ्या कर्नाटकमध्ये कोणाची सरशी होते हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

इंदिरा गांधी कर्नाटकमध्ये कधी लढल्या?आणीबाणी लादल्यानंतर आलेल्या विरोधी लाटेत इंदिरा गांधींना तेव्हा कर्नाटकने साथ दिली होती. 1977 ला झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर पोटनिवडणुकीत नोव्हेंबर 1978 मध्ये इंदिरा गांधी यांनी चिक्कमंगळूरमधून निवडणूक लढविली होती. या मतदारसंघाने इंदिरा यांना नवसंजिवनी मिळवून दिली. जनता पक्षाच्या विरेंद्र पाटील यांना त्यांनी 70 हजार मतांनी मात दिली होती. या विजयात कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री देवराज अर्स यांनी मोलाचा वाटा उचलला होता. 1977 च्या निवडणुकीत उत्तर भारतात काँग्रेसला सपाटून मार खावा लागलेला असताना एकट्या कर्नाटकात 28 पैकी 24 जागा मिळाल्या होत्या. इंदिरा गांधींसाठी चिक्कमंगळूमधून दोनवेळा खासदार झालेल्या डीबी चंद्रेगौडा यांनी खासदारकीवर पाणी सोडले होते. दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांच्या या त्यागाचे भविष्यात काहीच फळ मिळाले नाही.

टॅग्स :Karnataka Lok Sabha Election 2019कर्नाटक लोकसभा निवडणूक निकाल 2019B. S. Yeddyurappaबी. एस. येडियुरप्पाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९BJPभाजपाcongressकाँग्रेस