शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

कर्नाटकात 'घराणेशाही'चा सर्वपक्षीय उदो उदो..! दोन टप्प्यात निवडणुका; तीन माजी मुख्यमंत्री रिंगणात

By वसंत भोसले | Published: March 28, 2024 1:52 PM

karnataka lok sabha election 2024 : काँग्रेस पक्षाने आतापर्यंत दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या. दुसऱ्या यादीमध्ये राज्य मंत्रिमंडळातील पाच वरिष्ठ मंत्र्यांच्या मुलांचा समावेश आहे.

डॉ. वसंत भोसले

बंगळुरू : कर्नाटकातील २८ लोकसभा मतदारसंघात दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकीसाठीचे सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर होत असून या पक्षांनी घराणेशाहीला विरोध करण्याऐवजी उदो उदो करीत आपापल्या नातेवाईकांना उमेदवारी मिळवून दिलेली आहे.   काँग्रेस पक्षाने आतापर्यंत दोन उमेदवार याद्या जाहीर केल्या. दुसऱ्या यादीमध्ये राज्य मंत्रिमंडळातील पाच वरिष्ठ मंत्र्यांच्या मुलांचा समावेश आहे. मंत्री सतीश जारकीहोळी यांची कन्या प्रियंका चिक्कोडी, महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे चिरंजीव मृणाल बेळगावमधून तर बिदरचे पालकमंत्री ईश्वर खंदारे यांचा मुलगा सागर बिदरमधून, दक्षिण बंगळुरु मतदारसंघातून रामलिंगा रेड्डी यांची कन्या सोम्या रेड्डी, बागलकोटमधून मंत्री शिवानंद पाटील यांची कन्या संयुक्ता निवडणूक रिंगणात आहेत. दावणगेरेमधून मंत्री एस. एस. मल्लिकार्जुन यांच्या पत्नी व काँग्रेसच्या उमेदवार प्रभा मल्लिकार्जुन निवडणूक लढवीत आहेत. त्यांचे सासरे शामनूर शिवशंकराप्पा हे काँग्रेसचे ज्येष्ठ आमदार आहेत. राज्यसभेचे माजी उपसभापती के. रहमान खान यांचे चिरंजीव मन्सूर अली खान मध्य बंगळुरुमधून निवडणूक लढवत आहेत.        दरम्यान भाजप आणि धर्मनिरपेक्ष जनता दलाने या निवडणुकीत आघाडी केली आहे. मागील निवडणुकीत जनता दलाने काँग्रेस सोबत आघाडी करून निवडणूक लढवली होती. आता भाजप २५ जागा लढवीत असून जनता दलाला तीन जागा सोडण्यात आलेल्या आहेत. या तीन जागांमध्ये माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी मंड्यामधून तर त्यांचे पुतणे प्रज्वल रेवण्णा हसन मतदारसंघातून पुन्हा निवडणुकीला सामोरे जात आहेत. रेवणा मागील निवडणुकीत विजय संपादन केला होता. कर्नाटकातील धर्मनिरपेक्ष जनता दल पक्ष म्हणजे माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा आणि माजी मुख्यमंत्री एच.डी. कुमारस्वामी या पिता-पुत्रांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. देवेगौडा यांचे जावई प्रख्यात हृदयविकार तज्ज्ञ डॉ. सी. एन. मंजुनाथ बंगलोर ग्रामीणमधून भाजपच्या उमेदवारीवर निवडणूक लढवीत आहेत. ते गत निवडणुकीतील काँग्रेसचे एकमेव विजयी उमेदवार आणि उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांचे बंधू डी.के. सुरेश यांच्याविरुद्ध उभे आहेत.

काँग्रेस आणि जनता दलाच्या पावलावर पाऊल टाकीत घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपने देखील घराणेशाही सोडलेली नाही. गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते बी.एस. येडीयुरप्पा यांना बाजूला केल्याने भाजपचा दारुण पराभव झाला, असे मानले जाते. त्यामुळे या निवडणुकीत त्यांच्या पसंतीच्या उमेदवारांना पक्षश्रेष्ठींनी निवडलेले आहे. येडीयुरप्पा यांचे चिरंजीव खासदार डी.वाय. राघवेंद्र यांना शिमोगातून पुन्हा उमेदवारी देण्यात आलेले आहे. त्यांचे दुसरे चिरंजीव डी. वाय. विजेंद्र आमदार आहेत आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष पण आहेत. शिमोगाचे ज्येष्ठ भाजप नेते व माजी उपमुख्यमंत्री के. एस. ईश्वराप्पा यांनी भाजपमधील घराणेशाहीला विरोध करत नाराजी व्यक्त केली होती. मात्र, त्यांची नाराजी त्यांच्या चिरंजीवांना हावेरीतून उमेदवारी दिली नाही ही आहे. माजी मुख्यमंत्री सदानंद गौडा यांना बंगळुरु उत्तरमधून उमेदवारी नाकारण्यात आली आहे आणि तेथे केंद्रीय राज्यमंत्री शोभा करदलांजे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. श्रीमती करदलांजे या येडीयुरप्पा यांच्यात घनिष्ट असल्याचे सांगण्यात येते.                                                                                                       

मल्लिकार्जुन खरगे यांचे जावई रिंगणात

काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने करीत असताना कर्नाटकातील सर्वच पक्षांनी घराणेशाहीचाच मार्ग पत्करला आहे. एवढेच नव्हे तर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या पूर्वाश्रमीच्या गुलबर्गा लोकसभा मतदारसंघातून जावई राधाकृष्ण दोडमनी यांना उमेदवारी दिली आहे.

तीन माजी मुख्यमंत्री

कर्नाटकाचे तीन माजी मुख्यमंत्री निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जनता दलाचे कुमार स्वामी मंडयामधून निवडणूक लढवणार आहेत. भाजपचे बसवराज बोम्मई हावेरी मतदारसंघातून तर जगदीश शेट्टर बेळगावमधून निवडणूक रिंगणात आहेत.

टॅग्स :karnataka lok sabha election 2024कर्नाटक लोकसभा निवडणूक निकालBJPभाजपाcongressकाँग्रेस