Maharashtra Karnataka Dispute: सीमाप्रश्नाच्या सुनावणीतून कर्नाटकच्या न्यायमूर्तींची माघार, सुनावणी लांबणीवर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 16:03 IST2023-02-08T15:45:43+5:302023-02-08T16:03:35+5:30
पुढील आठवड्यात नव्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता

Maharashtra Karnataka Dispute: सीमाप्रश्नाच्या सुनावणीतून कर्नाटकच्या न्यायमूर्तींची माघार, सुनावणी लांबणीवर
प्रकाश बेळगोजी
बेळगाव : महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठात कर्नाटकाच्या न्यायमूर्तींची माघार घेतल्यामुळे आज, बुधवारची (दि. 8) सुनावणी लांबणीवर पडली. पुढील आठवड्यात नव्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
सीमाप्रश्नी आज महत्वाची सुनावणी होती. पण, त्रिसदस्यीय खंडपीठात कर्नाटकाच्या न्यायमूर्ती बी. व्ही. रत्नमाला यांचा समावेश होता. त्यामुळे सुनावणीबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत होती. दोन राज्यांच्या वादात संबंधित राज्याच्या न्यायमूर्तींनी सुनावणीत सहभागी होऊ नये, असे संकेत आहेत. त्यामुळे न्यायमूर्ती रत्नमाला यांनी या सुनावणीतून माघार घेतली. परिणामी आजची सुनावणी लांबणीवर पडली.
आजच्या सुनावणीसाठी महाराष्ट्राकडून ज्येष्ठ विधिज्ज्ञ वैद्यनाथन, कर्नाटकाकडून विधिज्ज्ञ मुकुल रोहतगी उपस्थित होते. पण, न्यायमूर्तींनी माघार घेतल्यामुळे हा खटला आता नव्या खंडपीठासमोर चालणार आहे. पुढील आठवड्यात सुनावणी होण्याची शक्यता आहे.