शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

कर्नाटकात 'हे' नेते ठरले काँग्रेससाठी 'गेमचेंजर', बघा कशी आखली रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 7:31 PM

गेमचेंजर रणनितीची इनसाईड स्टोरी

बंगळुरु: येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानं भाजपाचं सरकार कोसळलं आहे. बहुमतासाठी आवश्यक आकडा गाठता न आल्यानं बहुमत चाचणी होण्याआधीच येडियुरप्पा यांनी राजीनाम्याची घोषणा केली. आधी भाजपानं काँग्रेस आणि जेडीएसचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला होता. मात्र ही जुळवाजुळव होऊ न शकल्यानं येडियुरप्पा मुख्यमंत्री पदावरुन पायउतार झाले. त्यामुळे आता राज्यपाल काँग्रेस आणि जेडीएसला सत्ता स्थापनेचं निमंत्रण देतील. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेल्या या सत्ता संघर्षात काही काँग्रेस नेत्यांनी निर्णायक आणि महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडली. गुलाम नबी आझाद: काँग्रेसचे महासचिव असलेल्या आझाद यांनी निवडणुकीच्या निकालाआधीच बंगळुरु गाठलं. निकालानंतर त्यांनी पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा करुन रणनिती आखली. जेडीएसचे सर्वेसर्वा एच. डी. देवेगौडा यांच्याशी संवाद साधून त्यांच्या पक्षाला पाठिंबा देण्याची कल्पना आझाद यांची होती. देवेगौडा यांच्यावर दबाव आणण्यासाठी त्यांनी सीपीएमच्या सीताराम येचुरी, केरळमधील सीपीएमचे नेते पी. विजयन, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्यासोबतही संवाद साधला. यानंतर देवेगौडा यांनी काँग्रेसचा प्रस्ताव स्वीकारला.

अशोक गेहलोत: राजस्थानचे माजी मुख्यमंत्री असलेले गेहलोत सध्या काँग्रेसचे महासचिव आहेत. जेडीएस आणि अपक्ष आमदारांना एकत्र आणण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. भाजपाकडून फोडाफोडीचा प्रयत्न होणार, हे लक्षात घेऊन त्यांनी रणनिती आखली. गेहलोत पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या संपर्कात आहेत. त्यांच्याकडून प्रत्येक गोष्टीची माहिती राहुल यांना दिली जात होती. 

मल्लिकार्जुन खरगे: लोकसभेतील काँग्रेसचे नेते असलेल्या खरगे यांनी अशोक गेहलोत यांच्यासोबत मिळून रणनिती आखली. याशिवाय रणनितीची अंमलबजावणी होईल, याची खबरदारीही घेतली. भाजपाकडून आमदारांना पैशांची ऑफर दिली जाईल, याचा अंदाज घेऊन त्यांनी पुढील खबरदारी घेतली. आमदारांना सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी खरगे यांनी पार पाडली. 

सिद्धारमय्या: काँग्रेसला बहुमत न मिळाल्यानं मुख्यमंत्रीपद गमावलेल्या सिद्धरामय्या यांनी निवडणुकीनंतर भाजपाला सत्तेपासून रोखण्यात महत्त्वाची भूमिका पार पडली. रणनिती आखण्यात कुशल असलेल्या सिद्धरामय्यांनी भाजपाच्या चाणक्यांची प्रत्येक खेळी हाणून पार पडली. भाजपानं काँग्रेस आणि जेडीएसच्या ज्या ज्या आमदारांशी संपर्क साधला, त्या त्या आमदारांनी निष्ठा बदलू नये, याची काळजी त्यांनी घेतली. काँग्रेसच्या आमदारांसोबतच जेडीएसच्या आमदारांनाही एकत्र ठेवण्याचे शिवधनुष्य त्यांनी यशस्वीपणे पेललं.

अभिषेक मनू सिंघवी: काँग्रेस नेते सिंघवी यांनी कपिल सिब्बल यांच्या मदतीनं दिल्लीत किल्ला लढवला. राज्यपालांचा कौल भाजपाच्या बाजूनं गेल्यावर सिंघवी यांनी एकही क्षण न गमावता रात्रीच सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. राज्यपालांनी भाजपाला बहुमत सिद्ध करण्यासाठी 15 दिवसांची मुदत दिली होती. सिंघवी यांच्या न्यायालयातील युक्तीवादामुळे हा कालावधी थेट दीड दिवसावर आला. माजी महाधिवक्ते मुकूल रोहतगी भाजपाच्या बाजूनं युक्तिवाद करत असताना सिंघवी यांनी काँग्रेसची बाजू प्रभावीपणे मांडली. त्यामुळेच भाजपाला आमदारांची जुळवाजुळव करण्यासाठी फक्त दीड दिवसांचा अवधी मिळाला.  

टॅग्स :Karnataka Election Results 2018कर्नाटक निवडणूक निकाल २०१८Floor Testबहुमत चाचणीsiddaramaiahसिद्धरामय्याcongressकाँग्रेसYeddyurappaयेडियुरप्पाBJPभाजपा