शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

Karnataka Election: महिलांना मंगळसूत्र, स्मार्टफोन मोफत, १ टक्क्याने कर्ज; भाजपाची घोषणांची खैरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2018 11:33 IST

कर्नाटक विधानसभेसाठी अवघा आठवडा शिल्लक असताना, भारतीय जनता पार्टीने आपला जाहीरनामा प्रकाशित केला असून आश्वासनांचा पाऊस पाडलाय.

बेंगळुरूः कर्नाटक विधानसभेसाठी अवघा आठवडा शिल्लक आहे. 'स्टार प्रचारक' रिंगणात उतरलेत. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरींनी वातावरण तापलंय. सगळेच पक्ष घोषणांचा पाऊस पाडत असताना, भारतीय जनता पार्टीने आज आपला जाहीरनामा प्रकाशित केलाय आणि आश्वासनांची खिरापत वाटलीय. गरीब जनता, नारीशक्ती आणि बळीराजाला डोळ्यापुढे ठेवून हा जाहीरनामा तयार करण्यात आला आहे. त्यात गरीब महिलांना मोफत मंगळसूत्र आणि स्मार्टफोन देण्याची घोषणा करण्यात आलीय, तर दुष्काळग्रस्त भागांतील २० लाख शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची मदत देण्याचंही आश्वासन देण्यात आलंय. 

भाजपाच्या जाहीरनाम्यातील ठळक मुद्देः 

>> महिलांना २ लाखांपर्यंतचं कर्ज फक्त १ टक्का व्याजाने देणार>> दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील सर्व महिलांना मोफत स्मार्टफोन>> दुष्काळग्रस्त भागातील २० लाख शेतकऱ्यांना १० हजार रुपयांची मदत>> शेतकऱ्यांच्या कृषिपंपांना दहा तास मोफत वीज>> सिंचन योजनेसाठी दीड लाख कोटी रुपये >> दारिद्र्य रेषेखालील महिलांना लग्नाच्या वेळी ३ ग्रॅमचं मंगळसूत्र मोफत>> ३०० हून अधिक अन्नपूर्णा कँटीन>> महिलांच्या आणि मुलांच्या सुरक्षेसाठी संपूर्ण राज्यांत सीसीटीव्ही कॅमेरे>> काँग्रेस सरकारविरोधात श्वेतपत्रिका>> महिलांना एक रुपयांत सॅनिटरी नॅपकीन>> दारिद्र्य रेषेखालील महिला-मुलींना मोफत नॅपकीन>> महिलांच्या उन्नतीसाठी १० हजार कोटींचा निधी>> भूमिहीन शेतकऱ्यांसाठी २ लाख रुपयांची विमा योजना>> अनुसूचित जमातीच्या ४०० मुलांना शिक्षणासाठी परदेशी पाठवणार>> २४x७ भ्रष्टाचारविरोधी हेल्पलाइन>> प्रत्येक तालुक्यात रनिंग ट्रॅक आणि स्वीमिंग पूल  

दरम्यान, काँग्रेसने गेल्या आठवड्यातच आपला जाहीरनामा प्रकाशित केला. ५ वर्षांत कर्नाटकातील एक कोटी तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन यावेळी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी दिलं आहे. १८ ते २३ वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांना स्मार्टफोन देणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलं आहे. 

काँग्रेसच्या जाहीरनाम्यातील महत्त्वाचे मुद्दे

- मुलींसाठी मोफत पदव्युत्तर शिक्षण- शहरी भागात स्वस्त घरं बांधण्यासाठी समिती- शहरांतील झोपडपट्ट्यांचा विकास करण्यासाठी समिती- वाहतूक व्यवस्थेत सुधारणा- अल्पसंख्यकांचा सामाजिक आणि आर्थिक दर्जा वाढवणार- प्रत्येक घराला पिण्याचं पाणी पुरवणार

येत्या १२ मे रोजी कर्नाटक विधानसभेच्या २२४ जागांसाठी मतदान होणार असून १५ मे रोजी मतमोजणी होणार आहे.  

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८BJPभाजपाcongressकाँग्रेस