शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

Karnataka Election 2023: आता कर्नाटक विधानसभा निवडणुकीत शरद पवारांची एन्ट्री, 45 जागांवर उमेदवार उतरवणार NCP

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 01:30 IST

राजकीय जाणकारांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे...

कर्नाटक विधान सभा निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. सर्वच पक्ष कंबर कसून कामाला लागले आहेत. खरे तर भारतीय जनता पक्ष (भाजप), काँग्रेस (काँग्रेस) आणि जेडीएसमुळे ही निवडणूक आधीच तिरंगी झाली होती. मात्र आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या एन्ट्रीमुळे ही निवडणूक अधिकच चुरशीची होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी, आपला पक्ष कर्नाटकातील 224 विधानसभा जागांपैकी 40 ते 45 जागा लढवणार असल्याचे गुरुवारी सांगीतले होते. तसेच कर्नाटक निवडणुकीसंदर्भात योजना निश्चित करण्यासाठी शनिवारी मुंबईत बैठक घेणार असल्याचेही पवार यांनी म्हटले होते.

लवकरच निश्चित करणार उमेदवार यादी -शरद पवार यांनी शनिवारी मुंबई येथील पक्ष कार्यालयात बैठक बोलावली आहे. यासाठी कर्नाटकातील सर्व प्रमुख नेत्यांना बोलावण्यात आले आहे. कर्नाटकात 10 मे रोजी विधानसभा निवडणुका होत आहेत. या निवडणुकीसाठी आमचा पक्ष लवकरच उमेदवारांची यादी निश्चित करेल, असेही पवार यांनी म्हणाले आहे.

राजकीय जाणकारांच्या मते, राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळविण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. खरे तर, गोवा, मेघालय आणि मणिपूर या राज्यांमध्ये राष्ट्रवादीला काँग्रेसला फारसा फायदा झाला नाही. कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे निवडणूक चिन्हासंदर्भात अर्जही केला होता, तो आयोगाने स्वीकारला आहे.

लोकसभा निवडणुकीपूर्वी एकत्रीत येण्याचा प्लॅन -शरद पवार यांनी नुकतीच काँग्रेसाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांची भेट घेतली होती. यानंतर त्यांनी ही घोषणा केली आहे. सर्वच विरोधी पक्ष एकत्रित येऊन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला मात देण्याची योजना आखत आहेत. महत्वाचे म्हणजे, यावेळी कर्नाटकात 10 मे रोजी एकाच टप्प्यात सर्व जागांवर मतदान होणार आहे. तसेच लगेचत तीन दिवसांनी म्हणजेच 13 मे रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसKarnataka Electionकर्नाटक विधानसभा निवडणूकElectionनिवडणूकcongressकाँग्रेसBJPभाजपा