शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
3
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
4
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
5
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
6
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
7
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
8
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
9
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
10
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
11
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
12
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
13
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
14
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
15
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
16
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
17
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
18
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
19
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
20
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत

जिंकणाऱ्या काँग्रेसला थोपविण्यासाठी भाजपाचे 'अमेरिका मॉडेल'; कर्नाटकात आमदारांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2023 09:48 IST

2023 Karnataka Legislative Assembly election: भाजपाचे विद्यमान आमदारांमध्ये हालचाली वाढल्या. नाराजीवर पक्षाने सांगितले की जिंकण्याची शक्यता असलेल्यांनाच तिकीट...

कर्नाटक विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आणि त्यानंतर लगेचच आलेल्या ओपिनिअन पोलने भाजपाची झोप उडविली आहे. काँग्रेसने तर त्यापूर्वीच आपली पहिली यादी जाहीर केली होती. असे असताना आता भाजपाने निवडणुकीपूर्वीच्या ओपिनिअन पोलवर काम करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी भाजपाने कर्नाटकात अमेरिका म़ॉडेल राबविण्यास सुरुवात केली आहे. 

काँग्रेसने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. दुसरी यादी बनविताना कस लागत आहे. परंतू, भाजपाला ओपिनिअन पोलनी हादरे बसले आहेत. काँग्रेस-निजद सरकार पाडून भाजपाने सत्ता हिसकावली असली तरी ओपिनिअन पोलनुसार जनमत भाजपाच्या विरोधात गेले आहे. यामुळे सत्ता असूनही भाजपा पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. तसे कर्नाटक राज्य हे नेहमी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात जाणारे राज्य आहे. परंतू, गेल्या वेळी काँग्रेस सत्तेत होती, त्यांना कमी जागा मिळाल्या होत्या. तर निजदला काही जागा मिळाल्या होत्या. हे संख्याबळ सत्ता स्थापन करण्यासाठी पुरेसे असल्याने त्यांनी भाजपविरोधात सत्ता स्थापन केली होती. भाजपाने ही सत्ता उलथवून टाकली होती.

आता काँग्रेसचा विजय डोळ्यासमोर दिसत असल्याने भाजपाने अमेरिका म़ॉडेल आणले आहे. अनेक जागांवर भाजपाला काँग्रेस आणि निजदकडून टक्कर मिळत आहे. यामुळे भाजपाने उमेदवार निवडताना त्या त्या मतदारसंघात भाजपाच्या सदस्यांचे मतदान घेण्यास सुरुवात केली आहे. २२४ जागांवर प्राथमिक चर्चा झाली आहे. या जागांवर कोणता उमेदवार काँग्रेसला टक्कर देऊ शकतो, याबाबत चाचपणी सुरु असून इच्छुकांच्या नावावर मतदान घेतले आहे.

प्रत्येक मतदार संघात असे तीन संभाव्य उमेदवार निवडले जाणार आहेत. त्या मतदानावर व तुल्यबळ लढतीवर लक्ष केंद्रीत करत जाती-पातीचे समीकरण जुळवत भाजपा आपले उमेदवार जाहीर करणार आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष निवडताना जसे मतदान होते, तसे भाजपाने आपल्या स्तरावर घेतले आहे. 

काय होती योजना...प्रत्येक विधानसभा मतदारसंघात दोन वरिष्ठ सदस्यांना मतदानाची देखरेख ठेवण्यासाठी पर्यवेक्षक म्हणून निवडण्यात आले होते. एका मतदारसंघासाठी सरासरी १५० सदस्यांनी मतदान केले. मंडळ समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, सात मोर्चा आणि विंगच्या संघटनांचे हे सदस्य होते. यामध्ये महिला, एससी, एसटी, ओबीसी, युवा, शेतकरी, अल्पसंख्यांक सदस्यांना मतदानाची संधी देण्यात आली होती. 

भाजपा आमदार नाराज...भाजपाने अंतर्गत अशाप्रकारे मतदान प्रक्रिया राबविल्याने भाजपाचे विद्यमान आमदार नाराज झाले आहेत. या आमदारांना तिकीट मिळेल की नवा चेहरा दिला जाईल याबाबत ते साशंक आहेत. पक्षाने केवळ जिंकण्याची क्षमता असलेल्या आमदारांना चिंता करण्याची गरज नाही, एवढेच संकेत दिल्याने सर्वांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे.

टॅग्स :Karnatak Politicsकर्नाटक राजकारणKarnatakकर्नाटकBJPभाजपाcongressकाँग्रेस