Karnataka Election 2018 : सर्व एक्झिट पोलचा महापोल, नऊ एक्झिट पोल सरासरीचा कौल कुणाला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2018 21:53 IST2018-05-12T21:53:03+5:302018-05-12T21:53:03+5:30
आठ माध्यमांच्या कर्नाटकातील मतदानोत्तर जनमत चाचणी म्हणजेच एक्झिट पोलची सरासरी म्हणजे www.lokmat.com ने सादर केलेला कर्नाटकच्या निवडणुकीचा महापोल.

Karnataka Election 2018 : सर्व एक्झिट पोलचा महापोल, नऊ एक्झिट पोल सरासरीचा कौल कुणाला?
देशातील आठ प्रमुख न्यूज चॅनल्सनी नऊ चाचणी संस्थांसह केलेल्या मतदानानंतरच्या जनमत चाचण्यांच्या अर्थातच एक्झिट पोलमधून समोर आलेल्या आकडेवारीची सरासरी काढून www.lokmat.com ने एक महापोल आकडेवारी समोर आणली आहे. या आकडेवारीनुसार कर्नाटकचा कौल हा कोणत्याही एका पक्षाला नाही. सध्या देशात सत्ताधारी असणारा भाजपा ९६ जागांसह क्रमांक एकचा पक्ष ठरणार असून कर्नाटकातील सत्ताधारी काँग्रेस पक्ष ९२ जागांसह दुसऱ्या क्रमांकावर असण्याची शक्यता आहे. मात्र सत्तास्पर्धेतील या दोन पक्षांना स्पष्ट बहुमत प्राप्त होणार नसल्याने त्यांच्यापेक्षाही जास्त महत्व ३१ जागा मिळवणाऱ्या जनता दल धर्मनिरपेक्ष या तिसऱ्या क्रमांकावरील पक्षाला असणार आहे. इतर पक्ष किंवा अपक्ष अशा तीन आमदारांना तर हिऱ्यापेक्षाही जास्त भाव येण्याची शक्यता आहे. देशातील सात राष्ट्रीय आणि एका प्रादेशिक न्यूजचॅनल अशा आठ माध्यम संस्थांनी कर्नाटकात मतदानाच्या दिवशी केलेल्या नऊ एक्झिट पोलचे विश्लेषण केले असता पुढील आकडेवारी समोर येते:
एक्झिट पोलचा महापोल
टाइम्स नाऊ-चाणक्य | टाइम्स नाऊ- व्हीएमआऱ | इंडिया टुडे | न्यूज-१८ | इंडिया टीव्ही | सुवर्णा टीव्ही | एबीपी-सीव्होटर | रिपब्लिक | न्यूज एक्स | सरासरी | |
भाजपा | १२० | ०८७ | ०८४ | ०८७ | ०८७ | ०८४ | १०२ | १०५ | १०६ | ०९६ |
काँग्रेस | ०७३ | ०९७ | १११ | ०९७ | ०९७ | १११ | ०९३ | ०७८ | ०७५ | ०९२ |
जनता दल (ध) | ०२६ | ०३५ | ०२५ | ०३५ | ०३५ | ०२५ | ०२४ | ०३७ | ०३७ | ०३१ |
इतर | ००३ | ००३ | ००२ | ००३ | ००३ | ००२ | ००३ | ००२ | ००४ | ००३ |