शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

Karnataka Election 2018 : मतदार केंद्रांवर गोंधळ, पोलिग एजंट रद्द केल्याने वाद, उपाशी कर्मचारीही चिडले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 12:27 PM

कर्नाटक निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी काही मतदान केंद्रांवर गोंधळ झाला. तसेच आदल्या दिवशी निवडणूक ड्युटीवरील सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांची सोय न करण्यात आल्याने त्यांनीही संताप व्यक्त केला.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु होण्यापूर्वी आणि मतदानाच्यावेळीही काही मतदानकेंद्रांवर गोंधळ झाला. निवडणूक ड्युटीवर नेमण्यात आलेल्या सरकारी कर्मचारी अधिकाऱ्यांसाठी अन्न-पाण्याची सोय करण्यात आलेली नसल्याने त्यांचा संताप उफळून आला. तर मतदान सुरु झाल्यावर पोलिंग एजंट हे त्याच बुधमधील मतदार असणे आवश्यक असल्याचा नियम सांगण्यात आल्याने काही ठिकाणी बाचाबाचीही झाली. 

बेळगाव जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या आहेत. राज्यात इतरत्रही तसेच चित्र आहे. त्यामुळे अकरापर्यंतच मतदानाची टक्केवारी २४ टक्क्यांवर पोहचली. आज मतदानाची वेळ एकतासाने वाढवली असल्याने टक्केवारी चांगली वाढण्याची शक्यता आहे. मात्र सकाळी मतदान सुरु झाल्यावर काही मतदानकेंद्रांवर गोंधळ झाला. निवडणूक अधिकाऱ्यांनी मतदानकेंद्रांवरील राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे पोलिंग एजंट हे त्याच केंद्रातील मतदार असावेत असा नियम सांगितल्याने वाद निर्माण झाला. अनेक उमेदवारांसाठी ऐनवेळी प्रभाव नसलेल्या ठिकाणी पोलिंग एजंट मिळवणे कठिण होते. मात्र या गोंधळाची सुरुवात शुक्रवारपासूनच झाली. मतदानयंत्रे, व्हीव्हीपॅट युनिट आणि इतर साहित्य घेऊन मतदान केंद्रावर निघालेल्या सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या सोयीसाठी काहीच व्यवस्था नव्हती. काही ठिकाणी या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी भोजनाची व्यवस्थाच केलेली नव्हती, त्यामुळे त्यांच्यात नाराजी निर्माण झाली. हुबळीसारख्या ठिकाणी तर घोषणाही देण्यात आल्या. दुपारनंतरही भोजनाची व्यवस्था न झाल्याने अनेकांना त्रास झाल्याच्याही तक्रारी आल्या. “आमच्यापैकी बहुतेक चाळीशी ओलांडलेले आहेत. त्यांच्यापैकी अनेकांना हायपरटेन्शन, ह्रदयविकार, मधुमेह असे त्रास आहेत. त्यामुळे त्यांना वेळेवर जेवण तसेच पाणी मिळणे आवश्यक होते. मात्र त्याची व्यवस्था केली नव्हती. आम्ही काही भिकारी नाही, असे वागवायला...” अशा संतप्त प्रतिक्रिया निवडणूक ड्युटीवरील कर्मचारी व्यक्त करीत होते. 

काही ठिकाणी भोजन-पाण्याची व्यवस्था होती. मात्र मतदान ड्युटीवरील कर्मचाऱ्यांच्या संख्येचा अंदाज न घेता केली गेल्याने ती व्यवस्था पुरेशी नव्हती. विजयपुरात कर्मचाऱ्यांना साहित्य वितरणाची जबाबदारी सोपवण्यात आलेल्या सरकारी कर्मचाऱ्याचे निधन झाले. ते मतदान यंत्र देत असताना त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचा मृत्यू ओढवला. याच भागात कर्मचारी आणि साहित्य पाठवण्यासाठीच्या गाड्यांमध्ये इंधन भरलेले नसल्याने त्या निघू शकल्या नव्हत्या. त्यामुळे उशीर झाला. त्याची गंभीर दखल घेत तीन अधिकाऱ्यांविरोधात निलंबनाची कारवाई करण्यात आली.

टॅग्स :Karnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८Karnatakकर्नाटकbelgaonबेळगावcongressकाँग्रेसBJPभाजपाJanata Dal (Secular)जनता दल (सेक्युलर)