शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबतची डील यशस्वी झाली तर पूर्ण श्रेय माझे, फेल झाली तर जेडी वेन्सचे...; ट्रम्प यांचे मिश्कील विधान, पण खळबळजनक... 
2
बच्चू कडू यांच्यावर हत्येचा कट रचल्याप्रकरणी गुन्हा; आमदाराच्या चुलत भावालाच संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप
3
राज्यसभेत सर्वसामान्यांचा आवाज असलेल्या राघव चड्ढा यांचे शिक्षण किती? ‘अशी’ आहे राजकीय कारकीर्द
4
इराणनं आखला बदल्याचा 'मास्टर प्लॅन'! आखाती देशांतील ८ मोठे पूल 'हिट लिस्ट'वर; बघा संपूर्ण लिस्ट
5
आईस्क्रीम खाल्लं तर ५००० दंड! भारतातील 'या' गावाचा अजब पण धाडसी निर्णय; कारण काय?
6
इराण युद्धातच रशिया पुन्हा भारताच्या मदतीला; SU-30 लढाऊ विमाने घेणार भरारी, चीन-पाकला धडकी
7
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
8
कोणी केली डोनाल्ड ट्रम्प यांची येशू ख्रिस्तांशी तुलना? 'त्या' वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले...
9
वॉरेन बफे यांचे सूत्र भारतात हिट! १९०० अंकांच्या घसरणीनंतर सेन्सेक्स सावरला, कसे ओळखायचे 'व्हॅल्यू बाइंग'?
10
Crude Oil: भारताऐवजी चीनकडे वळला इराणचा कच्च्या तेलाचा टँकर; गुजरातला येणाऱ्या जहाजाचा ऐनवेळी मार्ग बदलला
11
डॉक्टरचा हलगर्जीपणा नडला! फोनवर नर्सला दिल्या डिलिव्हरीच्या सूचना; आईसह बाळाचा मृत्यू
12
पश्चिम बंगालमधील सर्वात 'लेटेस्ट' निवडणूक सर्वेक्षणात भाजपची मोठी मुसंडी; TMC ला झटका! जनतेचा 'मूड' बदलला?
13
“बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीचे प्रमुख नेते निर्णय घेतील”: संजय राऊत
14
तुम्ही घाबरलात राघव...! राज्यसभेतील उपनेते पदावरून हटविण्यामागचे कारण समोर आले, आपचे थेट आरोप... 
15
INS तारागिरी! समुद्रात येतंय वादळ, भारताची नौदल ताकद वाढणार; किती विध्वंसक आहे युद्धनौका?
16
अमेरिकेने इराणमध्ये मर्यादा ओलांडल्या! जिनिव्हा कन्व्हेन्शनचे नियम पायदळी तुडवले, काय केले..?
17
"आमच्या घरी नोटांची बंडलं यायची अन् बाबा..." ढोंगी अशोक खरातच्या मुलानेच उघडली पित्याची कुंडली
18
Life Lesson: जपानी लोकांसारखं यशस्वी आणि दीर्घायुषी व्हायचंय? 'या' सात नियमांचे आजपासून पालन करा
19
भयंकर! बिहारमध्ये विषारी दारूने घेतला चौघांचा बळी; अनेकांची गेली दृष्टी, ७ जणांची मृत्यूशी झुंज
20
इस्रायलचा पुन्हा एकदा विश्वासघात, नेतन्याहू संतापले; भारताच्या २ मित्र देशांमध्ये तणाव वाढला
Daily Top 2Weekly Top 5

नारळाच्या झाडावरुन तरुण पडला; उपचारासाठी पैसे लागतील म्हणून मित्रांनीच तलावात बुडवून मारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 13:59 IST

Karnataka Crime: दारुत नारळपाणी टाकण्यासाठी विनोदला जबरदस्तीने झाडावर चढवले.

Karnataka Crime:कर्नाटकातील रामनगर जिल्ह्यातील तरुणाच्या संशयास्पद मृत्यूमागील गूढ पोलिसांनी उलगडले आहे. तपासात स्पष्ट झाले की, नववर्षाच्या पार्टीदरम्यान जखमी झालेल्या तरुणाची त्याच्याच मित्रांनी तलावात बुडवून हत्या केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदीप आणि प्रज्वल यांना अटक करण्यात आली असून, इतर आरोपींची भूमिका तपासली जात आहे.

तिघे जिवलग मित्र

विनोद कुमार (26) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो मगडी तालुक्यातील कल्याणपूर गावाचा रहिवासी होता. विनोद, सुदीप आणि प्रज्वल हे तिघेही जिवलग मित्र असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

नारळाच्या झाडावर चढवले; अपघातात गंभीर दुखापत

पोलिसांच्या माहितीनुसार, 1 जानेवारी रोजी नववर्ष साजरे करण्यासाठी विनोदसह पाच मित्र पार्टीसाठी बाहेर पडले होते. पार्टीदरम्यान मद्यपानासाठी नारळपाणी आणण्याचा बेत करण्यात आला. इतर मित्र्यांनी विनोदला जबरदस्तीने नारळाच्या झाडावर चढून नारळ काढण्यास सांगितले. झाडावर चढताना विनोदचा तोल गेला आणि तो खाली कोसळला. या अपघातात त्याच्या मणक्याला (स्पाइनल कॉर्ड) गंभीर दुखापत झाली आणि तो अत्यवस्थ झाला.

उपचार खर्चाच्या भीतीतून हत्या

विनोदच्या उपचारासाठी लाखो रुपयांचा खर्च येऊ शकतो, हे लक्षात येताच आरोपी घाबरले. पोलिस तपासात असे निष्पन्न झाले की, या भीतीपोटी त्यांनी विनोदला ‘घरी सोडतो’ असे सांगून वाटेत वाजरहल्ली गावाजवळील एका तलावात बुडवून त्याची हत्या केली.

पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न

तलावात बुडविल्यानंतर आरोपी गावात सामान्यपणे फिरत राहिले. सायंकाळी ते पुन्हा घटनास्थळी गेले, तलावातून मृतदेह बाहेर काढला आणि ताराने मोठा दगड बांधून तो जवळच्या विहिरीत फेकून दिला, जेणेकरून पुरावे नष्ट होतील.

पालकांच्या तक्रारीनंतर उलगडले प्रकरण

विनोद कुमार बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या पालकांनी कुदूर पोलीस ठाण्यात दाखल केल्यानंतर या प्रकरणाचा उलगडा झाला. पोलिसांनी बेपत्ता प्रकरण नोंदवून सखोल तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि मित्रांची चौकशी करताना सत्य समोर आले की विनोदची हत्या त्याच्याच मित्रांनी केली आहे.

पुढील तपास सुरू

सध्या मुख्य आरोपी सुदीप आणि प्रज्वल यांना अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींची भूमिका काय होती, याचा तपास सुरू आहे. या प्रकरणातील सर्व पैलूंची बारकाईने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Friends kill man after tree fall, fearing medical costs.

Web Summary : In Karnataka, friends killed a man injured in a fall, fearing high medical bills. They drowned him in a lake and tried to dispose of the body. Two suspects are arrested, and further investigation is underway.
टॅग्स :Karnatakकर्नाटकCrime Newsगुन्हेगारी