शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

कर्नाटकात पुन्हा सत्तेचं नाटक; 'ऑपरेशन लोटस'मुळे काँग्रेस-जेडीएस सरकार धोक्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2019 13:32 IST

काँग्रेस-भाजपामध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी

बंगळुरु: कर्नाटकमधीलकाँग्रेस-जेडीएसची सत्ता उलथून टाकण्यासाठी भाजपानं जोर लावल्याची माहिती समोर येत आहे. काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्यासाठी भाजपानं 17 जानेवारीपर्यंची डेडलाईन निश्चित केली आहे. भाजपाकडून आमदार फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी केला आहे. तर काँग्रेसला स्वत:चे आमदार सांभळता येत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडून आमच्यावर आरोप केले जात असल्याचा पलटवार भाजपा नेते आणि केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनी केला आहे. काँग्रेस-जेडीएसचं सरकार पाडण्यासाठी भाजपा 'ऑपरेशन लोटस'वर काम करत असल्याचा गंभीर आरोप शिवकुमार यांनी केला. सत्ता उलथवण्यासाठी आमच्या तीन आमदारांना मुंबईतील एका हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे. त्यांना पैशांचं आमिष दिलं जात आहे. त्या ठिकाणी भाजपाचेही काही आमदार आहेत. काँग्रेस आमदारांना किती रुपयांची ऑफर दिली जात आहे, याची सर्व माहिती आमच्याकडे आहे, असा दावा त्यांनी केला. आमचे मुख्यमंत्री भाजपाच्या बाबतीत जरा जास्तच उदार असल्याचं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनाही लक्ष्य केलं. सर्व आमदारांनी त्यांना भाजपाच्या कटकारस्थानाची कल्पना देऊनही मुख्यमंत्र्यांनी काहीच केलं नाही, असं शिवकुमार म्हणाले. कर्नाटकच्या विधानसभेत काँग्रेस आणि जेडीएसचे एकूण 116 आमदार आहेत. तर भाजपाच्या आमदारांची संख्या 104 इतकी आहे. काँग्रेस-जेडीएसला दोन अपक्षांनी पाठिंबा दिला आहे. यासोबतच बहुजन समाज पार्टीचा एक आमदारदेखील त्यांच्या सोबत आहे. त्यामुळे काँग्रेस-जेडीएसचं संख्याबळ 119 वर जातं. मात्र अपक्ष आमदार आर. शंकर आणि बहुजन समाज पार्टीच्या एन. महेश यांची कॅबिनेटमधून गच्छंती करण्यात आल्यानं त्यांचे सत्ताधाऱ्यांसोबतचे संबंध ताणले गेले आहेत. विधानसभेतील आमदारांची संख्या 207 वर आणण्याचा भाजपाचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अशा परिस्थितीत बहुमताचा आकडा 104 होईल. भाजपाकडे सध्या इतकेच आमदार आहेत. मात्र यासाठी भाजपाला सत्तेत असलेल्या 16 आमदारांचे राजीनामे आवश्यक आहेत. दोन अपक्ष आणि एक बसपा आमदार यांची नाराजी भाजपाच्या पथ्यावर पडू शकते. मात्र इतक्या आमदारांच्या राजीनाम्यांबद्दल राजकीय विश्लेषक महादेव प्रकाश यांनी शंका व्यक्त केली. निवडणूक होऊन फक्त 7 महिने झाले आहेत. त्यामुळे इतके आमदार राजीनामे देतील, असं वाटत नसल्याचं प्रकाश म्हणाले. 

टॅग्स :kumarswamyकुमारस्वामीKarnatakकर्नाटकKarnatak Politicsकर्नाटक राजकारणBJPभाजपाcongressकाँग्रेस