Karnataka Accident: कारचालकाचं नियंत्रण सुटलं अन् होत्याचं नव्हतं झालं; विचित्र अपघातात ७ जण ठार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2026 10:38 IST2026-02-13T10:38:20+5:302026-02-13T10:38:56+5:30

Karnataka Hoskote-Dabaspet Highway Accident: बंगळुरूजवळील होस्कोट-दबासपेटे राष्ट्रीय महामार्गावर तीन वाहनांत विचित्र अपघात घडला, ज्यात सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

Karnataka Accident: Speeding SUV Rams Into Bike and Truck; 7 Dead on Hoskote-Dabaspet Highway | Karnataka Accident: कारचालकाचं नियंत्रण सुटलं अन् होत्याचं नव्हतं झालं; विचित्र अपघातात ७ जण ठार!

Karnataka Accident: कारचालकाचं नियंत्रण सुटलं अन् होत्याचं नव्हतं झालं; विचित्र अपघातात ७ जण ठार!

बंगळुरूजवळील होस्कोट-दबासपेटे राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी पहाटे एक अंगाचा थरकाप उडवणारी घटना घडली. होस्कोट-दबासपेटे राष्ट्रीय महामार्गावरील एम. सत्यावरा गावाजवळ अनेक वाहनांच्या झालेल्या विचित्र अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पहाटेच्या सुमारास घडला. होस्कोटहून देवनहल्लीच्या दिशेने जाणाऱ्या एका वेगवान एसयूव्ही कारने दुचाकीला मागून जोरात धडक दिली. या धडकेनंतर एसयूव्ही चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि ही कार समोरील एका ट्रकला जाऊन धडकली. या भीषण अपघातात कारमधील सहा आणि दुचाकीस्वार अशा एकूण सात जणांचा जागीच मृत्यू झाला.

प्राथमिक माहितीनुसार, मृत व्यक्ती बेंगळुरूमधील कोठानूर येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र अद्याप त्यांची अधिकृत ओळख पटलेली नाही. पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी होस्कोट येथील सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत. होस्कोट पोलिसांनी याप्रकरणी अपघाताची नोंद केली असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

Web Title : चालक ने खोया नियंत्रण, बैंगलोर के पास भीषण दुर्घटना में 7 की मौत

Web Summary : बैंगलोर के होसकोटे के पास एक दुखद दुर्घटना में सात लोगों की मौत हो गई। एक एसयूवी ने एक मोटरसाइकिल को टक्कर मारी, फिर एक ट्रक से टकरा गई, जिसके परिणामस्वरूप कई लोगों की जान चली गई। पीड़ितों के बेंगलुरु के कोठानूर के होने का अनुमान है। पुलिस मामले की जांच कर रही है।

Web Title : Driver lost control, horrific accident kills 7 near Bangalore.

Web Summary : Seven people died in a tragic accident near Bangalore's Hoskote. An SUV hit a motorcycle, then collided with a truck, resulting in multiple fatalities. The victims are believed to be from Kothanur, Bangalore. Police are investigating the incident.