Karnatak Byeletion Live: BJP on back foot Both the Legislative and parliamentary Assembly | Karnatak Byeletion : मंड्यामध्ये भाजपाचा मोठा पराभव; जेडीएस सव्वातीन लाख मतांनी जिंकली
Karnatak Byeletion : मंड्यामध्ये भाजपाचा मोठा पराभव; जेडीएस सव्वातीन लाख मतांनी जिंकली

बेंगळुरु : कर्नाटक विधानसभा दोन आणि लोकसभेच्या तीन मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीतील मतमोजणीला आज सुरुवात झाली. यामध्ये तिन्ही जागांवर भाजपचे उमेदवार पिछाडीवर पडले असून काँग्रेस आणि जेडीएसच्या उमेदवारांनी मोठी आघाडी घेतली आहे.

कर्नाटक विधानसभेच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्री कुमारस्वामी यांच्या पत्नी अनिता यांनी रामनगर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचा 109137 मतांच्या फरकाने धुव्वा उडविला असून भाजपाचे एल. चंद्रशेखर यांचा पराभव केला आहे. तर भाजपाने शिमोगा राखले असून येडीयुराप्पांचे पुत्र राघवेंद्र 52148 मतांनी विजयी झाले आहेत. मंड्यामध्ये भाजपाचा मोठा पराभव झाला असून जेडीएस सव्वातीन लाख मतांनी जिंकली आहे. 

जमखंडी विधानसभा मतदारसंघातीन काँग्रेसचे उमेदवार न्यामगौडा यांनी भाजपावर 32933 मतांनी आघाडी मिळविली असून जेडीएसच्या अनिता कुमारस्वामी यांनी रामनगर मतदारसंघातून 82928 मतांची भक्कम आघाडी मिळविली आहे. तर भाजपाचे बी वाय राघवेंद्र यांनी 36467 मतांनी शिमोगा लोकसभा मतदारसंघातून आघाडी घेतली आहे. 

 
धक्कादायक म्हणजे भाजपचा बालेकिल्ला राहिलेल्या बेळ्ळारी लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या उग्रप्पा यांनी तब्बल 184203 मतांची आघाडी घेतली आहे. तर मंड्या लोकसभा मतदारसंघातून जेडीएसच्या शिवरामेगौडा यांनी 121963 मतांची आघाडी घेतली आहे.  

काँग्रेस जमखंडी विधानसभा आणि बळ्ळारी लोकसभा मतदारसंघात आघाडीवर. जेडीएस रामनगर विधानसभा आणि मंड्या लोकसभा मतदारसंघात आघाडीवर. भाजपाला केवळ एकाच शिमोगा लोकसभा मतदारसंघात आघाडी. 

शिमोगा लोकसभा मतदारसंघात भाजपचे बी वाय राघवेंद्र यांनी जेडीएसच्या उमेदवारावर 9665 मतांची आघाडी मिळविली.

मंड्या लोकसभा मतदारसंघामध्ये जेडीएसच्या उमेदवाराची भाजपच्या उमेदवारावर 1,09,066 मतांची आघाडी. पाचवी फेरी पूर्ण. तर बळ्ळारी मतदारसंघात 1 लाख 723 मतांनी पिछाडीवर. 

बळ्ळारीमध्ये भाजपाच्या जे शांता 64000 मतांनी पिछाडीवर 

बळ्ळारी लोकसभा मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उग्राप्पा यांची भाजपच्या जे शांता यांच्यावर 45808 मतांची आघाडी.  

चौथ्या फेरीनंतर जमखंडीमध्ये भाजपाचे श्रीकांत कुलकर्णी 7149 मतांनी पिछाडीवर.  तर अनिता कुमारस्वामी यांची रामनगर मतदारसंघातून भाजपाच्या एल. चंद्रशेखर यांच्यावर तिसऱ्या फेरीअखेर 14813 मतांची आघाडी. शिमोगा लोकसभा मतदारसंघात भाजपाच्या बीवाय राघवेंद्र यांची जेडीएसच्या एस मधु बंगारप्पा यांच्यावर 3906 मतांची आघाडी. 


जमखंडी मतदारसंघात भाजपाच्या श्रीकांत कुलकर्णी हे काँग्रेसचे उमेदवार आनंद सिद्दू न्यामगौडा यांच्यापेक्षा 55433 मतांनी पिछाडीवर आहेत. आतापर्यंत तीन फेऱ्या झाल्या आहेत. तर कर्नाटकचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांची पत्नी अनिता कुमारस्वामी यांनी भापाच्या एल चंद्रशेखर यांना पहिल्या दोन फेऱ्यामध्ये 8430 मतांनी पिछाडीवर टाकले आहे. 


 खाण घोटाळ्यासाठी कुप्रसिद्ध असलेल्या आणि भाजपचा बालेकिल्ला बळ्ळारी लोकसभा मतदारसंघामध्येही भाजपची पिछेहाट होत आहे. काँग्रेसच्या व्हीएस उग्राप्पा यांनी भाजपाच्या जे शांता यांच्यावर 17480 मतांनी आघाडी मिळविली आहे. पहिली फेरी पूर्ण झाली आहे. 

 

Web Title: Karnatak Byeletion Live: BJP on back foot Both the Legislative and parliamentary Assembly

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.