शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

करमाळा ग्रामपंचायत

By admin | Updated: July 30, 2015 23:14 IST

करमाळा : तालुक्यातील मांगी व देवळाली या दोन ग्रामपंचायतीमध्ये माजी आ.शामल बागल व पंचायत समितीचे उपसभापती कल्याणराव गायकवाड यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेली असून या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केल्याने निवडणुकीत भलतीच चुरस निर्माण झाली असून या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

करमाळा : तालुक्यातील मांगी व देवळाली या दोन ग्रामपंचायतीमध्ये माजी आ.शामल बागल व पंचायत समितीचे उपसभापती कल्याणराव गायकवाड यांच्या प्रतिष्ठेची निवडणूक ठरलेली असून या दोन्ही ग्रामपंचायतींमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केल्याने निवडणुकीत भलतीच चुरस निर्माण झाली असून या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मांगी ग्रामपंचायतीमध्ये तर गेल्या पंचवीस वर्षांपासून ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोधची परंपरा सुरू होती. दिगंबरराव बागल यांच्या निधनानंतर मांगी गावात तीन वर्षांपासून स्थानिक बागल गटात फूट पडलेली आहे. माजी आ.शामल बागल यांचे चिरंजीव व मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्या कार्यपद्धतीला कंटाळून सोसायटीचे अध्यक्ष देवानंद बागल व बचत गट व ग्रंथपाल संघाचे अध्यक्ष सुचित बागल यांनी स्वतंत्र पॅनल करून माजी आ.बागल यांना यंदा प्रथमच ग्रामपंचायतमध्ये तगडे आव्हान दिले आहे. मांगी ग्रामपंचायतीच्या ३ प्रभागातील एकूण ९ जागांपैकी १ जागा बिनविरोध झाली असून ८ जागांसाठी १७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.
देवळाली ग्रामपंचायत निवडणुकीत यंदा चुरस निर्माण झाली आहे. पंचायत समितीचे उपसभापती व ग्रामपंचायतीवर २० वर्षांपासून एकहाती सत्ता अबाधित ठेवलेले कल्याणराव गायकवाड यांना ग्रामपंचायत निवडणुकीत एकेकाळी त्यांचे समर्थक राहिलेल्यांनी विरोध करून त्यांच्या पॅनल विरोधात लढत दिली आहे. शिवाय त्यांचे पारंपरिक विरोधक चंद्रसेन ननवरे,कानगुडे यांनी गायकवाड त्यांच्या विरोधकांना एकत्रित करून निवडणुकीत चुरस निर्माण केली आहे. देवळाली ग्रामपंचायतीमधील ५ प्रभागातील १३ जागांसाठी २६ उमेदवार उभे असून या ग्रामपंचायतीमध्ये सरळ व चुरशीची लढत रंगली आहे. (वार्ताहर)