शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

Kargil Vijay Diwas: 'ऑपरेशन बद्र' Vs. 'ऑपरेशन विजय'... का झालं कारगिल युद्ध?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2018 19:50 IST

Kargil Vijay Diwas 2018 कारगिल विजय दिवसाच्या (२६ जुलै) निमित्तानं या युद्धाचा इतिहास आणि कारणं जाणून घेऊ या.

Kargil Vijay Diwas 2018 भारत आणि पाकिस्तान या दोन शेजाऱ्यांमधील छत्तीसचा आकडा जगाला माहीत आहे. भारताने पाकिस्तानला 'टाळी' देण्याचा अनेकदा प्रयत्न केला, पण पाकचे कांगावे आणि कुरापतींमुळे ही मैत्री होऊ शकलेली नाही. उलट, काश्मीरवर पाकिस्तानने हक्क दाखवलं आणि नियंत्रण रेषेवर नापाक कारवाया करणं यामुळे भारत-पाकमधील तणाव वाढतच चाललाय. या पार्श्वभूमीवर, 'पाकला पुन्हा एकदा कारगिलसारखा दणका द्यायला हवा', अशी इच्छा अनेक जण व्यक्त करतात. त्याच अनुषंगाने, कारगिल विजय दिवसाच्या (२६ जुलै) निमित्तानं या युद्धाचा इतिहास आणि कारणं जाणून घेऊ या. 

भारत-पाकिस्तानमध्ये १९७१ मध्ये झालेलं दुसरं युद्धही भारतानं जिंकलं होतं. पण, दोनदा हिसका दाखवूनही पाकिस्तानचं शेपूट वाकडंच आहे. उलट, हे पराभव त्यांच्या इतके जिव्हारी लागलेत की, भारताला अस्थिर करण्यासाठी ते कुठल्याही थराला जाऊ शकतात. पण, भारतीय लष्कराच्या जिगरबाज जवानांनी त्यांचे सगळे कट उधळून लावले. त्यापैकी सगळ्यात मोठा कट होता, तो म्हणजे 'ऑपरेशन बद्र'. अणुचाचणीच्या मुद्द्यावरून भारत-पाकमधील संबंध टोकाला गेले होते. हे वातावरण निवळावं, सीमांवर शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून दोन्ही देशांनी फेब्रुवारी १९९९ मध्ये लाहोर इथे करारावर स्वाक्षऱ्या केल्या. या करारानुसार, काश्मीर प्रश्नावर द्विपक्षीय चर्चा करून शांततामय मार्गाने तोडगा काढण्याचं निश्चित करण्यात आलं होतं. परंतु, 'हम नही सुधरेंगे' वृत्तीच्या पाकिस्तानने कुरापती सुरूच ठेवल्या. लष्कराच्या आणि निमलष्करी दलाच्या जवानांना लपूनछपून नियंत्रण रेषेपलीकडे पाठवण्यास त्यांनी सुरुवात केली. हेच होतं, 'ऑपरेशन बद्र'. काश्मीर आणि लडाखला जोडणारा मार्ग तोडून भारतीय जवानांना सियाचीनमधून हटवण्याचं कारस्थान त्यांनी रचलं होतं. कारण, या भागात तणाव निर्माण झाल्यास काश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय स्तरावर जाईल आणि भारतावर दबाव वाढवता येईल, असं पाकिस्तान समजत होता. 

सुरुवातीला ही घुसखोरी भासवण्यात आली. पण, भारतीय जवान डोळ्यात तेल घालून परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. नियंत्रण रेषेवर शोधमोहीमेदरम्यान पाकिस्तानचा कट उघड झाला. मोठा हल्ला करण्याच्या तयारीनं पाकने आपल्या जवानांनाच LoC पार पाठवलं असल्याचं बिंग फुटलं आणि भारताचे तब्बल २ लाख जवान 'ऑपरेशन विजय' यशस्वी करण्यासाठी सज्ज झाले. तब्बल ६० दिवस ते जिद्दीने लढले आणि जिंकले. 

कारगिल हा भाग समुद्रसपाटीपासून १३ ते १८ हजार फूट उंचीवर आहे. तिथलं तापमान उणे ३० ते उणे ४० अंश सेल्सियस इतकं असतं. अशा वातावरणात आपले जिगरबाज जवान न डगमगता शत्रूशी मुकाबला करत होते. इतक्या उंचीवर कधीच कुठलंच युद्ध झालं नव्हतं. या युद्धात २६ जुलै १९९९ च्या दिवशी शेवटचा पाकिस्तानी सैनिक मारला गेला आणि भारतीय जवानांनी कारगिलवर अभिमानानं तिरंगा फडकवला. भारतीय लष्कराचे ५४३ अधिकारी आणि जवान या युद्धात शहीद झाले. आपण देशवासीयांनी सदैव त्यांचे ऋणी राहायला हवं.    

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तान