शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Kargil Vijay Divas: कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेयसी आता कुठे आहे, काय करते? वाचून डोळ्यात येईल पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 12:25 IST

Kargil Vijay Divas: जेव्हा जेव्हा कारगिल युद्धाचा विषय येतो तेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पराक्रमाची नेहमी आठवण काढली जाते. ऐन तारुण्यात आपलं जीवन देशावरून ओवाळून टाकणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणीसुद्धा तेवढीच भावूक करणारी आहे.

आज कारगिल युद्धात भारतील लष्कराने मिळवलेल्या विजयाला २४ वर्षे पूर्ण झाली आहे. या युद्धामध्ये अनेक तरुण जवानांनी पाकिस्तानी आक्रमणाविरोधात पराक्रमाची शर्थ करत भारतमातेचं संरक्षण केलं होतं. या लढाईत भारताच्या अनेक जवानांना वीरमरण आलं होतं. यामध्ये एक नाव होतं कॅप्टन विक्रम बत्रा. जेव्हा जेव्हा कारगिल युद्धाचा विषय येतो तेव्हा कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या पराक्रमाची नेहमी आठवण काढली जाते. ऐन तारुण्यात आपलं जीवन देशावरून ओवाळून टाकणाऱ्या कॅप्टन विक्रम बत्रा यांची प्रेमकहाणीसुद्धा तेवढीच भावूक करणारी आहे.

कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या प्रेयसीचं नाव डिंपल चिमा असं होतं. कॅप्टन विक्रम बत्रा आणि डिंपल चिमा यांची भेट १९९५ मध्ये पंजाब विद्यापीठात झाली होती. ही त्यांची पहिली भेट होती. एमए इंग्रजीच्या अभ्यासक्रमासाठी दोघांनीही प्रवेश घेतला होता. मात्र काहीच दिवसांतच विक्रम बत्रा यांना डेहराडून येथे असलेल्या सैन्यदल प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळाला. त्यामुळे ते प्रशिक्षणासाठी रवाना झाले. मात्र तोपर्यंत विक्रम आणि डिंपल यांच्यातील प्रेम बहरले होते.

विक्रम बत्रा लष्करी प्रशिक्षण घेत असताना डिंपल त्यांची वाट पाहत होत्या. इकडे डिंपल यांच्या कुटुंबीयांनी तिच्या लग्नासाठी तगादा सुरू केला होता. मात्र डिंपल यांना केवळ विक्रम बत्रा यांच्याशीच लग्न करायचं होतं. कुटुंबीयांचा लग्नासाठी दबाब वाढवल्यावर अखेर डिंपल यांनी विक्रम बत्रांकडे लग्नाचा विषय काढला. तेव्हा विक्रम यांनी पाकिटातून ब्लेड काढलं आणि अंगठा कापला आणि त्या रक्तानं डिंपलची भांग भरली.

विक्रम बत्रा आणि डिंपल चिमा आपल्या भावी आयुष्याची स्वप्न रंगवत असतानाच तिकडे सीमेवर कारगिलमध्ये पाकिस्तानने घुसखोरी केली आणि युद्धाला तोंड फुटलं. त्यामुळे विक्रम बत्रा यांना युद्धासाठी रवाना झाले. कारगिलमध्ये त्यांनी मोठा पराक्रम गाजवला. मात्र पाकिस्तानी घुसखोरांशी लढताना त्यांना वीरमरण आलं. विक्रम यांच्या अकाली जाण्याने डिंपल यांना मोठा धक्का बसला. मात्र त्यांचं प्रेम कायम होतं. त्यामुळे त्यांनी विक्रम बत्रा यांच्या आठवणीमध्ये कायम अविवाहित राहण्याचा निर्णय घेतला.

डिंपल चीमा सध्या एका शाळेमध्ये शिक्षिका म्हणून काम करत आहेत. तसेच विक्रम बत्रा यांच्या आठवणीमध्ये जीवन जगत आहेत. आपलं विक्रम बत्रा यांच्यावर प्रेम आहे, असं त्या अभिनामाने सांगतात. विक्रम बत्रा आणि डिंपल चिमा यांची ही प्रेमकहाणी शेरशाह या चित्रपटामध्ये दाखवण्यात आली होती. 

टॅग्स :Kargil Vijay Diwasकारगिल विजय दिनIndian Armyभारतीय जवानLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट