शहरं
Join us  
Trending Stories
1
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
2
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
3
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकट; KL राहुलनं एक कॅच सोडला
4
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
5
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
6
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
7
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
8
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
9
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
10
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!
11
बदल्याची आग! आईने वडिलांना फसवून दुसरं लग्न केलं, संतापलेल्या मुलाने तिला कारने चिरडलं
12
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
13
कैदी नंबर १५,५२८, प्रज्वल रेवण्णाचा तुरुंगातील दिनक्रम आला समोर, दररोज करावं लागेल एवढं काम   
14
Putrada Ekadashi 2025: पुत्रदा एकादशीला 'हे' नियम पाळले तरच होतो संतानसुखाचा लाभ!
15
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
16
४० व्या वर्षीही करू शकता गुंतवणुकीचा श्रीगणेशा; रिटायरमेंटच्या वेळी होऊ शकता कोट्यधीश, महिन्याला किती कराल गुंतवणूक
17
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
18
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
19
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता; आता 'या' मोठ्या नेत्यानं दिली समज

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2021 21:00 IST

"उत्तर भारतातील लोकांप्रती गांधी कुटुंबाच्या मनात हीन भावना आहे, तर मग हे लोक उत्तर भारतात राजकारण का करतात. राहुल गांधी ज्या उत्तर भारताचा अपमाण करत आहेत. त्याच भागातून त्यांची आई सोनिया गांधी खासदार आहे. राहुल गांधींचे वक्तव्य माफी लायक नाही."

नवी दिल्ली -राहुल गांधींच्या (Rahul Gandhi) एका वक्तव्यामुळे काँग्रेसमध्ये पुन्हा अस्वस्थता निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल (Kapil sibbal) यांनी राहुल गांधींना त्यांच्या या वक्तव्यावरून समज अथवा सल्ला दिला आहे. राहुल गांधी यांना सल्ला देताना सिब्बल म्हणले, सर्व मतदारांचा सन्मान करायला हवा. मग तो उत्तेरेतील असो किंवा दक्षिनेतील, मतदार हे समजदार असतात. त्यांना त्यांच्या अधिकारांची जाण असते. कुणाला मतदान करायचे आणि कुणाला करायचे नाही, हे त्यांना चांगल्या प्रकारे ठाऊक असते. मगतो दक्षिणेकडील राज्यांतील मतदार असो किंवा उत्तरेकडील राज्यांतील मतदार असो अथवा पश्चिम बंगालमधील असो किंवा इतर कुठल्याही भागातील असो. (Kapil sibbal advices to Rahul Gandhi over his statement says voters should respected)

भाजपचाही निशाणा - राहुल गांधी यांच्या त्रिवेंद्रममधील या वक्तव्यावरून भाजपनेही निशाणा साधला होता. केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती ईरानी यांनी गांधी कुटुंबावर निशाना साधताना उत्तर भारतातील लोकांप्रती गांधी कुटुंबाच्या मनात हीन भावना आहे, तर मग हे लोक उत्तर भारतात राजकारण का करतात. राहुल गांधी ज्या उत्तर भारताचा अपमाण करत आहेत. त्याच भागातून त्यांची आई सोनिया गांधी खासदार आहे. राहुल गांधींचे वक्तव्य माफी लायक नाही. एवढेच नाही, तर  उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीदेखील राहुल गांधींवर निशाणा साधला. "सनातन आस्थेच्या केरळपासून प्रभू श्रीरामांच्या जन्मस्थळ असलेल्या उत्तर प्रदेशपर्यंत सर्व लोकांनी तुम्हाला ओळखले आहे. तोडण्याचे राजकारण हे तुमचे संस्कार आहेत. आम्ही उत्तर किंवा दक्षिण नाही, तर संपूर्ण देशालाच मातेसमान मानतो," असे योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. 

राहुल गांधींच्या वक्तव्यावर भाजपचा हल्लाबोल; स्मृती इराणी म्हणाल्या, "कृतघ्न..."

काँग्रेसचे स्पष्टीकरण -काँग्रेस नेते आनंद शर्मा यांनी निवेदन जारी करत म्हटले आहे, की राहुल गांधींनी केलेले वक्तव्य हा त्यांचा वैयक्तीक अनुभव आहे. राहुल गांधींनी भारतातील कुठलेही राज्य अथवा लोकांचा अनादर केलेला नाही. 

काय म्हणाले होते राहुल गांधी - "गेल्या 15 वर्षांपर्यंत मी उत्तर भारतात खासदार होतो. मला एका वेगळ्या प्रकारच्या राजकारणाची सवय झाली होती. माझ्यासाठी केरळमध्ये येणे नवे होते. कारण मला वाटले इथल्या लोकांना मुद्द्यांमध्ये आवड असते आणि ते मुद्द्यांच्या विस्तारात जाणारे आहेत," असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केले होते.

"तुम्हाला गर्लफ्रेंड आहे का?"; मुलीने विचारलेल्या बेधडक प्रश्नावर राहुल गांधी म्हणतात...

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसkapil sibalकपिल सिब्बलSmriti Iraniस्मृती इराणीyogi adityanathयोगी आदित्यनाथKeralaकेरळ